शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
4
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
5
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
6
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
7
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
8
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
9
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
10
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
11
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
12
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
13
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
14
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
15
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
16
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
17
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
18
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
19
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
20
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...

दोन गट, नऊ गणात थेट लढत

By admin | Updated: February 15, 2017 01:57 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारी झाल्यानंतर, ७५ गट व १५0 गणांसाठी एकूण ९७३ उमेदवार रिंगणात

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारी झाल्यानंतर, ७५ गट व १५0 गणांसाठी एकूण ९७३ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ४४ जागेवर तिरंगी लढती होत असल्या, तरी ११ जागेवर थेट लढत होणार आहे. यात गटासाठी दोन व गणासाठी ९ जागांचा समावेश आहे. २१ फेबु्रवारी रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गट व १५0 गणांसाठी निवडणूक होत आहे. ६ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गटांसाठी ५२९, तर गणांसाठी ९०५ असे १४३४ उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. यात पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्याची संख्या अधिक होती. अर्ज छाननीत काही जणांचे अर्ज बाद झाले होते. असे असले तरी मोठ्या प्रमाणात अर्ज शिल्लक होते. सोमवारी माघारीच्या दिवशी १४३५ अर्जांपैैकी ४६१ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे गण व गटाच्या २२५ जागांसाठी आता ९७३ उमेदवार रिंगणात आहेत. यात पंचायत समितीच्या १५0 गणांसाठी ६१४, तर ७५ गटांसाठी ३५९ उमेदवार आहेत. ही निवडणूक सर्वच पक्ष स्वबळावर लढवित असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्यासह काही ठिकाणी मनसे, रासप व काही ठिकाणी स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिले आहेत. त्यामुळे बहुरंगी लढती या अपेक्षितच आहेत. जिल्हा परिषदेचा पळसदेव-बिजवडी हा एकमेव गट असा आहे की, तिथे सर्वाधिक १0 उमेदवार रिंगणात आहेत. ७५ गटांपैैकी शिरूरमधील शिक्रापूर-सणसवाडी व खेडमधील रेटवडी पिंपळगावतर्फे खेड या दोन गटांत थेट लढत होत आहे. यात शिक्रापूर-सणसवाडी गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होत आहे. राष्ट्रवादीतर्फे कुसूम मांढरे व भाजपातर्फे कुसुम खैैरे रिंगणात आहेत. तसा हा गट राष्ट्रवादीचा बालकिल्ला. कै. बाळासाहेब खैरे हे येथील राष्ट्रवादीचे नेते. ते शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहिले, मात्र शेवटी शेवटी ते नाराज होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कुसुम खैरे या राष्ट्रवादीकडून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संधी साधत भाजपाने त्यांना तिकीट दिले. इतर कोणत्याही पक्षाचा उमेदवार येथे नसल्याने ही थेट लढत होत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या रेटवडी तर्फे पिंपळगाव खेड या गटात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीतर्फे निर्मला पानसरे, तर शिवसेनेतर्फे सुवर्णा जवळेकर एकमेकींविरोधात लढत आहेत. यापूर्वी या गटात काँग्रेसचे दादाभाऊ पारधी निवडून आले होते. मात्र, त्यानंतर ते शिवसेनेत गेले. काँग्रेसचा गट असूनही येथे त्यांना उमेदवार देता आला नाही. (प्रतिनिधी)