शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या तटबंदीविरुद्ध संघर्ष करा

By admin | Updated: January 28, 2017 01:17 IST

जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे.

पुणे : जाती-धर्माचा आधार घेऊन राबणाऱ्या कष्टकरी जनतेचे शोषण करणारी व्यवस्था आज मोठ्या प्रमाणात फोफावललेली दिसत आहे. त्यामुळे या जातीधर्माच्या तटबंदी फोडण्यासााठी चित्रकार-कलाकारांसह तरुणांनी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. महात्मा फुलेवाड्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित समता मेळाव्यात गुरुवारी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारच्या तटबंदी या समाजाच्या विकासातल्या अडसर असतात. त्यामुळे जातीच्या नावाने माणसा-माणसांत उभ्या केलेल्या तटबंदी झुगारून देऊन मानवमुक्तीच्या माणूसपणाची लढाई अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी सगळ््यांचीच आहे. अशा प्रकारची तटबंदी तोडण्याचा विचार फुले-शाहू-आंबेडकर यांनी दिला आहे. त्या मार्गाने आपण हा संघर्ष तीव्र केला पाहिजे. कलाकारांनी चित्रकलेच्या माध्यमातून जातमुक्त समाजाकडे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून दिला आहे. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बचावासाठी तुमच्यासोबत आहोत.’’ या वेळी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश जोशी, श्रीधर अंभोरे, प्रा. अंजली मायदेव, प्रा. प्रतिमा परदेशी, बाबासाहेब ललकारे आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने जाती तोडो... माणूस जोडो या संकल्पनेवर आयोजित चित्रप्रदर्शनातील विजेत्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुजा जगताप व योगेश भुवड यांच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. अमोल पवार व किसन आडे यांना द्वितीय व चैतन्य खरे व समृद्धी राजेशिर्के यांना तृतीय पारितोषिक मिळाले. शुभम करंजकर याला उत्तेजनार्थ व प्रियांका कोरडे हिचा विशेष पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. चित्रप्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट मुलींच्या चित्राला बालाजी वाघमारे यांच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रकाश जोशी व श्रीधर अंभोरे यांनीही चित्रकलेच्या दृश्य माध्यमातील रंगरेषांचा अर्थ स्पष्ट करीत चित्राला भाषा, प्रदेशाचे बंधन नसते. त्यातील मुक्तीची आस महत्त्वाची असते, असे सांगितले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अंजली मायदेव यांनी स्वागत केले. गौतम ललकारे यांनी आभार मानले. किसन आडे, अनिता टेकाळे, संजय धावरे यांनी विशेष परिश्रम घेतले.