शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाचपट दंड

By admin | Updated: August 7, 2016 03:57 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाच ते दहापट दंड भरावा लागणार आहे.

बारामती : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पाच ते दहापट दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीच्या मनमानीला त्यामुळे चाप बसणार आहे. ५ आॅगस्टपासूनच वाढीव दंड आकारणीला सुरुवात करण्यात आली आहे.बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय अकोलकर यांनी अधिक माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार : हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय हेल्मेट न घालता दुचाकीवर मागे बसणाऱ्यालादेखील दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. विनाहेल्मेट प्रवास केल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. कलम १७७ च्या मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकास यापूर्वी केवळ १०० रुपये दंड आकारणी करण्यात येत होती. आता मात्र दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यास दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलादेखील पाचपट दंड भरावा लागणार आहे. मात्र, वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, वाहनांना टेललाईट नसणे, फ ॅन्सी नंबर प्लेट वापर केल्याप्रकरणी यापूर्वी कलम १७७ अंतर्गत यापूर्वी केवळ १०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता हा दंड दहापट म्हणजे १००० रुपये भरावा लागणार आहे. लायसन नसणाऱ्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, लायसनशिवाय वाहन चालविल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड ३०० रुपये होता. विहीत वेगमर्यादेहून अधिक वेगाने वाहन चालविणे, धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्यासाठी १००० दंड केला आहे. हा दंड अनुक्रमे ४०० आणि ६०० रुपये होता. तसेच, विनानोंदणी दुचाकीशिवाय इतर वाहन चालविल्यास मालक आणि चालकालादेखील दुप्पट दंड २००० हजार रुपये भरावा लागेल. विमा प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे चालकासाठी जैसे थे ३०० रुपयेच ठेवण्यात आला आहे. मात्र, विमा प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविल्यास सहापटहून अधिक २००० रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड ३०० रुपये होता.मीटर पडताळणीचे काम पुन्हा परिवहन विभागाकडे...आॅटो रिक्षा आणि टॅक्सी मीटरच्या पडताळणीचे काम पूर्वीप्रमाणेच परिवहन विभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. मीटरच्या पडताळणीबाबत पुणे येथील मे स्टँडर्ड मीटर मॅन्यु. कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.याचिकेमध्ये वैधमापनशास्त्र यंत्रणेकडे असलेल्या साधनसामग्रीचा अभाव, त्यामुळे शासनाकडे मिळालेल्या तक्रारी विचारात घेऊन तपासणी पूर्ववत परिवहन विभागाकडे सोपाविण्यात आली आहे, अशी माहिती बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली.