शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सलग पाचव्यांदा मावळात भाजपला यश

By admin | Updated: October 20, 2014 00:17 IST

मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला.

पिंपरी : मावळचा गड राखण्यात भाजपला सलग पाचव्यांदा यश आले आहे. बाळा भेगडे यांनी विजय संपादन करून राट्रवादीचे माऊली दाभाडेंचा पराभव केला. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याने मावळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रहावे लागले. युती असताना निवडणुकीस सामोरे गेलेल्या बाळा भेगडे १४ हजार ३१८ मतांनी विजयी झाले होते. तर यंदा युती नसताना दुपटीने म्हणजेच २८ हजार ०१ मतांनी विजयी झाले. मावळ तालुक्यात भाजपचे प्राबल्य आहे. गेली चार पंचवार्षिक भाजपचाच आमदार निवडून येत आहे. यात त्यांना युतीच्या माध्यमातून शिवसेनेची साथ असायची. मात्र, यंदा युती तुटल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्ररित्या निवडणुकीस सामोरे गेले. याचा फायदा राष्ट्रवादी काँगे्रसला फायदा होईल. हे डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांची संख्या अधिक असतानाही राष्ट्रवादीकडून बंडखोरी थोपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्येही यशही आले. माऊली दाभाडे यांच्या रुपाने एकच उमेदवार रिंगणात उतरला. मात्र, राष्ट्रवादीची ताकत असतानाही अंतर्गत गटबाजी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. आपल्यालाच उमेदवारी याची खात्री मनात बाळगून सुरुवातीपासूनच तयारीत असलेल्या बाळा भेगडेंना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला. प्रचार यंत्रणाही सक्षमरित्या राबविली. मोदी लाटेचाही मोठा परिणाम भेगडेंच्या विजयात आहेच. अमित शहा, विनोद तावडे, पंकजा मुंढे यांच्या सभेंचाही चांगला प्रभाव पडला. तळेगावसह तालुक्यातही आरएसएसचा चांगला प्रभाव आहे. याचाही भेगडेंना फायदा झाला. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजप बहुमतात आल्यास भेगडेंना मंत्रीपद मिळेल. आणि भेगडेंच्या माध्यमातून तालुक्याला ‘लाल दिवा’ मिळेल या अपेक्षेनेदेखील मतदारांनी भेगडेंना कौल दिला. भेगडेंना ९५ हजार ३१९ मते मिळाली. त्यांनी २८ हजार ०१ मतांनी विजय संपादन केला. राष्ट्रवादीकडून माऊली दाभाडे यांनीही ताकत लावली होती. ६७ हजार ३१८ मते मिळाली. विजयासाठी त्यांना तब्बल २८ हजार मते कमी पडली. उमेदवारी जाहीर होण्यास झालेला उशिर दाभाडेंसाठी नुकसानीचे ठरले. प्रचारासाठी त्यांना कमी वेळ मिळाला. त्यातच त्यांची प्रचारयंत्रणाही कमी पडली. अनुभवी व्यक्तीमत्व आणि राष्ट्रवादीने थोपविलेली बंडखोरी यामुळे यंदा राष्ट्रवादी जागा जिंकणार असे वाटत होते. मात्र, यंदाही राष्ष्टवादी काँगे्रसच्या पदरी निराशाच पडली. मावळात काँगे्रसला मानणारा वर्ग असल्याने किरण गायकवाड यांना यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांना अवघी १७ हजार ६२४ मते मिळाली. तर अनेक वर्षे युतीच्या माध्यमातून एकत्रित लढलेल्या शिवसेनेला अचानकपणे निवडणूक रिंगणात उतरावे लागले. कसलीही तयारीत नसताना निवडणूक लढविणे म्हणजे शिवसेनेसाठी आव्हानात्कम होते. प्रचारास वेळही अपुरा पडला. शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे यांनी केवळ १७ हजार ३८५ मते घेतली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मावळात ताकद कमी झाल्याचे दिसले.गेल्या विधानसभा निवडणुकीत ८ हजार मते घेतलेल्या मनसेने यंदा चार हजारांचा आकडाही पार करता आला नाही. मनसेचे मंगेश वाळुंज यांना तीन हजार ७९२ मते मिळाली. (प्रतिनिधी)