शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘मुळशी पॅटर्न’ कलाकारांचा मुळशीकरांकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 02:35 IST

मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने बावधन येथे नागरी सत्कार करण्यात आला.

भूगाव : मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञांचा मुळशी तालुका पत्रकार संघ आणि नगरसेवक किरण दगडे यांच्यावतीने बावधन येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व कलावतांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या कलावतांना पाहण्यासाठी बावधनमध्ये गर्दी लोटली होती.यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मलाताई, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार शरद ढमाले, बबनराव दगडे, तुकाराम हगवणे, सत्यवान उभे, किरण दगडे, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुणे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरपंच पियुषा दगडे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुळशी तालुका वारक?्यांचा, कुस्तीगिरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्याची ओळख जगभर पोचवायची आहे. आतापर्यंत मिळालेले सगळे पुरस्कार आईवडीलांना समर्पित करतो, असे भावोद्गार प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले. तरडे पुढे म्हणाले की मुळशी पॅटर्न चित्रपटाला अनेक भाषांमधून मागणी येवू लागली आहे. शेतजमीन विकल्यानंतर कुटूंबाची अवस्था कशी बिकट होते, त्यातून निर्माण होणा?्या गुन्हेगारीचे वास्तववादी दर्शन या चित्रपटातून दाखविले आहे. त्यामुळे आजही हा चित्रपट गाजत आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित रेती पॅटर्न या चित्रपटाची निमीर्ती करणार आहे.अशोक मोहोळ म्हणाले की युवा पिढीला चांगला संदेश देणारा हा चित्रपट आहे. मुळशी तालुक्यातल्या एका शेतक?्याचा मुलाने काढलेला चित्रपट भारतभर गाजतोय. सलमान खान यावर चित्रपट काढून त्याचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रवीण तरडे यांना आमंत्रित करतोय. यातच या चित्रपटाचे यश सामावलेले आहे. प्रास्ताविकात किरण दगडे यांनी तालुक्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.यावेळी प्रास्ताविक नगरसेवक किरण दगडे, सूत्रसंचालन मुळशी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्र गोळे यांनी केले.>लेकाचं कौतुक ऐकून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रूया कार्यक्रमासाठी प्रवीण तरडे यांचे वडील विठ्ठल आणि आई रखमाबाई आवर्जून उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थितांनी तरडे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी त्यास दाद दिली. लेकाचे हे कौतुक ऐकताना रखमाबार्इंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. या मातापित्यांना सत्कारासाठी व्यासपीठावर आमंत्रित केल्यानंतर रखमाबाईंची भावनाविवशता सर्वांना दिसली.