बावडा : परिसरातील भांडगाव शेटेवस्तीनजीक भीमा नदीपात्रात बेकायदा सुरू असलेला वाळूउपसा लोकमतच्या वृत्तानंतर थांबला आहे. माफियांनी आपला गाशा गुंडाळला असल्याने उत्खननापासून नदीपात्राला दिलासा मिळाला आहे. महसूल विभागाच्या वरदहस्ताने दिवसाढवळ्या इतकेच नव्हे, तर रात्रीसुद्धा वाळूउपसा मोठ्या प्रमाणावर सुरू होता. यासंदर्भात लोकमतने छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर महसूल विभागाने दखल घेत घटनास्थळी जाऊन कारवाई केली. मात्र, महसूलचे कर्मचारी पोहोचण्याआधीच वाळूमाफियांनी आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे रिकाम्या हातानेच अधिकाऱ्यांना परतावे लागले. मात्र दुसऱ्या दिवशी वाळूवाहतूक करणारा बावडा येथील एक ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह वाळू जप्त करण्यात आली.नदीपात्रातून खुलेआम दररोज वाळूउपसा होत असतानाही व रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना आर्थिक देवाणघेवाणीतून अथवा राजकीय दबावाने दुर्लक्ष करणाऱ्या महसूल विभागाने एखादे वाहन पकडून कारवाईची मलमपट्टी करू नये, असे सर्वत्र चर्चिले जात आहे.पत्रकारांना धमकावण्याचे प्रकारवृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना अज्ञातांनी छायाचित्रे काढू नये, म्हणून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास पत्रकारांनी दाद दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर गावातील दुसऱ्या पत्रकारास त्यांच्या दुकानी जाऊन दमदाटी करून धमकावण्याचा प्रकार घडला. याचा स्थानिक पत्रकारांनी निषेध नोंदविला आहे.
भीमा नदीपात्रातून वाळूमाफियांचा काढता पाय
By admin | Updated: January 29, 2017 03:51 IST