शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांसाठी भरावे लागेल शुल्क

By admin | Updated: January 30, 2016 04:08 IST

देशातील २० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या यादीत समावेश झाला आहे. पुण्याला मिळालेला दुसरा क्रमांक पूर्णपणे गुणवत्ता व पुणेकरांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाचे फलित आहे.

येरवडा : देशातील २० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या यादीत समावेश झाला आहे. पुण्याला मिळालेला दुसरा क्रमांक पूर्णपणे गुणवत्ता व पुणेकरांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाचे फलित आहे. भविष्यात पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येईल, याचा आपल्याला विश्वास वाटतो. मात्र यासाठी प्रचंड निधी खर्च करावा लागणार असून, नागरिकांना जादा सुविधांसाठी शुल्क द्यावे लागेल. त्याचबरोबर ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करून मोठ्या प्रमाणात निधी उभारला जाईल. राज्य सरकार व महापालिकेच्या माध्यमातूनच ही कंपनी स्थापन केली जाईल. स्मार्ट सिटीत समाविष्ट होण्यासाठी कुणावरही दबाव नसून, निवड झालेल्या कुठल्याही शहराला या योजनेतून बाहेर पडता येऊ शकते, असे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले. पुण्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी नायडू यांचे शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेदहाला लोहगाव विमानतळावर आगमन झाले. या वेळी त्यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आले. यानंतर विमानतळावरच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, विमानतळाचे संचालक अजय कुमार, संदीप खर्डेकर, महेंद्र गलांडे आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद, या शहराची गुणवत्ता व निवड समितीने दिलेल्या गुणांवर पुण्याला दुसरा क्रमांक मिळाला असून, यामध्ये राज्य ते केंद्र सरकारपर्यंत कुठलाही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. पुण्याला स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका ५ वर्षांत ३ हजार कोटी खर्च करणार आहे. मात्र, हा निधी पुरेसा नसून ‘एसपीव्ही’च्या माध्यमातून जागतिक बँक व परदेशी गुंतवणूकदारांकडून ५० हजार कोटींचा निधी उभारण्याची संकल्पना आहे. यातील ३८ हजार कोटी पायाभूत सुविधांसाठी, तर १२ हजार कोटी वाहतूक, दळणवळण व इतर सुविधांसाठी खर्च करण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून ही संकल्पना अस्तित्वात आणली असल्याचे नायडू म्हणाले.