शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रोलिंगमुळे टिष्ट्वटचीही भीती - मधुर भांडारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:15 IST

चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टिष्ट्वट करण्याचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले.

पुणे - चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टिष्ट्वट करण्याचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मान्यता दिल्यावर त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, चित्रपटाची संहिता सेन्सॉर होता कामा नये, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ८ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाअंतर्गत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची मुलाखत आयोजिण्यात आली होती. संजय डावरा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘काळाप्रमाणे समाज खूप बदलला आहे. ‘इंदू सरकार’च्या वेळी मी अनेक अडचणींचा सामना केला. माझ्यावर आलेली वेळ उद्या कोणावरही येऊ शकते, असे मी ओरडून सांगत असतानाही चित्रपटसृष्टी माझ्या पाठीशी उभी राहिली नाही. ‘पद्मावत’लाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. एखाद्या चित्रपटाला जाहीरपणे पाठिंबा दिल्यास भविष्यात आपल्याला अडचणी येतील, विशिष्ट सरकारचा शिक्का बसेल, घरावर मोर्चे येतील, अशी प्रत्येकाला भीती वाटते. संवेदनशील समाजाकडून ताबडतोब प्रतिक्रिया उमटतात,’ असेही त्यांनी नमूद केले.भांडारकर म्हणाले, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. एखाद्या मंदिराला भेट दिली की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झालात का, अशी टिप्पणी केली जाते.एखादा चित्रपट एखाद्या गटाला आवडतो, तर एखादा गट त्यावर आक्षेप घेतो. मात्र, प्रत्येक चित्रपट सर्वांचे समाधान करू शकत नाही. राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक विषयांवर बेतलेले चित्रपट काढताना ‘डिस्क्लेमर’ दिल्यास आक्षेप घेतला जात नाही. मात्र, चित्रपट विशिष्ट घटनेशी संबंधित असल्याचे सांगताच विरोध सुरू होतो.चित्रपटनिर्मिती करताना डिस्क्लेमर दाखवणे, पुस्तकावर आधारित चित्रपटासाठी पुस्तकाचे हक्क विकत घेणे, व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कुटुंबीयांची परवानगी घेणे अशा माध्यमातून दिग्दर्शकांना मार्ग काढता येऊ शकतो.’समाजातील अनेक विषय महिलाप्रधान दृष्टिकोनातून मांडता येऊ शकतात. दिग्दर्शक एखाद्या चित्रपटावर खूप मेहनत घेतो. तो बोटीवरचा कॅप्टन असतो आणि इतर सर्व प्रवासी असतात. कलाकाराने दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा. सध्या भारतात चालू घडामोडींवर आधारित चित्रपट बनत आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे व्यावसायिक चित्रपटांमधूनही संदेश देणे आवश्यक असते. ‘इंदू सरकार’च्या निमित्ताने नवीन पिढीला आणीबाणीच्या काळाबाबत किमान मूलभूत माहिती मिळाली. आणीबाणीबाबत दस्तावेज उपलब्ध नाही, त्यामुळे चित्रपटातून त्यावर भाष्य करता आले. यावर्षी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार आहे.- मधुर भांडारकर

टॅग्स :Puneपुणे