शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरीवर एफडीएचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:43 IST

चटपटीत, चटकदार पाणीपुरी बनतेय कशी याचा कोणीही विचार करीत नाही. अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्याने ब-याचदा तरुणांसह लहान मुले आजारी पडतात.

पुणे : चटपटीत, चटकदार पाणीपुरी बनतेय कशी याचा कोणीही विचार करीत नाही. अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्याने ब-याचदा तरुणांसह लहान मुले आजारी पडतात. अन्न व औषध प्रशासनाने अस्वच्छ पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून पुणे शहरातील १७ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, तसेच ११ हजार रुपयांच्या पाणीपु-या जप्त केल्या आहेत.पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून एफडीएच्या अधिकाºयांनी पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यात रस्त्यावर व दुकानातील पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी केली जात आहे. शासकीय परवाना न घेता रस्त्यावर कुठेही, तसेच रस्त्यालगत स्टॉल उभे करून पाणीपुरीची विक्री करणाºया एकूण ४३ स्टॉल्सची तपासणी करण्यात आली आहे. एफडीएच्या अन्नसुरक्षा अधिकाºयांनी स्वच्छता व दुकानात वापरल्या जाणाºया मालाच्या दर्जाची तपासणी केली. त्यात पुणे जिल्ह्यात १७, साता-यातील ४, सांगलीतील ३, सोलापूरमधील ३ आणि कोल्हापुरातील ६ पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २९, ५०० रुपये दंड वसूलकरण्यात आला.

पुरी बनविण्याचे कारखाने अस्वच्छ-पाणीपुरी हा पदार्थ चटपटीत असला तरी पाणीपुरीसाठी तयार केल्या जाणाºया पुºया नेमक्या कोणत्या ठिकाणी आणि कशा तयार केल्या जातात. याबाबतची माहिती घेण्याचा सर्वसामान्य नागरिक जराही प्रयत्न करीत नाहीत. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एफडीएच्या अधिकाºयांनी पाणीपुरीसाठी पु-या तयार करणाºया ४ कारखान्यांवर छापे टाकले. त्यात जराही स्वच्छता नसलेल्या ठिकाणी पाणीपुºया तयार केल्या जात असल्याचे निदर्शनास आले.पुण्यातही पाणीपुरी तपासणी मोहीम राबविली जात आहे. पुणे विभागातील एफडीएचे अधिकारी कालिदास शिंदे, गणपत कोकणे, संतोष सावंत, अजित मेहेत्रे, रवींद्र जेट्टे, डी. एम. बांबळे, अविनाश भांडवलकर आदींनी पाणीपुरी तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई केली आहे. त्यात एफडीएचे अधिकारी अरुण धुळे यांनी तब्बल ११ हजार ८०० रुपयांच्या पाणीपुºया जप्त केल्या आहेत.एफडीएचे सहायक आयुक्त संपत देशमुख म्हणाले, ‘‘प्रामुख्याने इतर राज्यातून पुण्यात आलेल्या व्यक्तींकडून रस्त्यावर कुठेही उभे राहून पाणीपुरीचा व्यवसाय केला जात असल्याचे दिसून येते. तसेच लहान-मोठे स्टॉल उभे करूनही हा व्यवसाय केला जात आहे. मात्र, रस्त्यावरील ठेल्यांवर वाहनाच्या येण्या-जाण्यामुळे पाणीपुरीवरधूळ उडते. स्वच्छता न राखल्यामुळे त्यावर माशा घोंघावतात. ग्राहकांना पाणीपुरी देण्यासाठी वापरल्या जाणाºया प्लेटस् स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींची तपासणी करून पाणीपुरी विकेत्यांवर कारवाई केली जात आहे.