शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

सावधान,तुम्ही कुठला गूळ खाताय : पुण्यात एफडीएची गूळ उत्पादकांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 6:13 PM

दौंड तालुक्यात खामगाव व केडगाव येथील गूळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.त्यात ३ लाख ७२ हजार ५१ रुपये किमतीचा गूळ जप्त करण्यात आला. तसेच गुळ उत्पादकांना  एफडीएच्या अधिका-यांनी तात्काळ गूळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले.परंतु,सर्व तृटींची पूर्तता केल्यानंतर गुळाची निर्मिती पुन्हा सुरू करता येईल,असेही एफडीएने स्पष्ट केले.

पुणे: दौंड तालुक्यात खामगाव व केडगाव येथील गूळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.त्यात ३ लाख ७२ हजार ५१ रुपये किमतीचा गूळ जप्त करण्यात आला. तसेच गुळ उत्पादकांना  एफडीएच्या अधिका-यांनी तात्काळ गूळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले.परंतु,सर्व तृटींची पूर्तता केल्यानंतर गुळाची निर्मिती पुन्हा सुरू करता येईल,असेही एफडीएने स्पष्ट केले.

             दौंड तालुक्यातील खामगाव येथील अनुज गूळ उद्योगचा ३ हजार ६०० किलो गूळावर कारवाई करण्यात आली.या गूळाची एकूण किंमत ९० हजार रुपये आहे. तसेच सुयश गूळ उद्योगच्या ६३ हजार रुपये किमतीच्या २ हजार ५२० किलो गूळावर कारवाई झाली. त्याचप्रमाणे शिवम एंटरप्रायजेसच्या १ लाख २८ हजार ३३१ किमतीच्या ६ हजार १११ किलो वजनाच्या गूळावर कारवाई केली. तर केडगाव येथील एस.पी.गूळ उद्योगाच्या ९० हजार ७२० रुपये किमतीच्या ३ हजार ७८० किलो गूळावर कारवाई करण्यात आली.

             सर्व प्रकारच्या अन्न पदार्थ उत्पादकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.गूळ उत्पादकांनी नियमानुसार ३ हजार रुपये शुल्क भरून परवाना घेणे बंधनकारक आहे.परंतु,या उत्पादकांनी केवळ १०० रुपये शुल्क परवाना घेतला आहे. त्याचप्रमाणे गूळ उत्पादन करताना गु-हाळाचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. परंतु, एफडीएच्या अधिका-यांनी केलेल्या पहाणीत गु-हाळाचा परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे खाण्यासाठी योग्य नसलेल्या रंगाचा वापर गूळामध्ये केला जात असल्याचे अढळून आले.त्यामुळे एफडीएच्या अधिका-यांनी सर्व उत्पादकांना उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :FDAएफडीएfoodअन्न