शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

एफडीएने ‘फुकरें’ना ठोठावला दंड : सहाशे जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 16:56 IST

सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे.

ठळक मुद्देतब्बल ६३६ नागरिकांवर कारवाई , पाऊण लाखांचा दंड वसुल

पुणे : सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अशा तब्बल ६३६ नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांना तब्बल ८६ हजार ५१० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ जाहिरातींवरील प्रतिबंध, व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास प्रतिबंध आहे. केंद्र व राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी, आरोग्यसेवा, विक्रीकर, प्राप्तीकर, परिवहन, केंद्रीय अबकारी विभागाचे निरीक्षक, पोलीस,पंचायत राज संस्थेचे पदाधिकारी, पोस्टमास्टर व त्या पदावरील अधिकारी, विमानतळ व्यवस्थापक, भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांना सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. या शिवाय शाळा, महाविद्यालयांचे प्रमुख, मुख्याध्यापक, जिल्हा धिक्षण अधिकारी, पुस्तकालय अधिकारी, बसस्थानक प्रमुख, तिकीट तपासणीस, वाहतुक अधिक्षक, सरकारी वकील, निबंधक, सहाय्यक निबंधकांना देखील अशी कारवाई करता येऊ शकते.  मात्र, यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच संस्था कारवाई करताना दिसतात. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघड केली. एफडीएने २०१३ पासून डिसेंबर २०१७ अखेरीस ६३६ व्यक्तींवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ८६ हजार ५१० रुपयांचा दंड वसुल केला. या काळात २०१५-१६ आणि २०१६-१७ साली सर्वाधिक कारवाई करण्यात आली. या वर्षी अनुक्रमे २३६ आणि १७२ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३४ हजार १०० आणि २० हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पाठोपाठ २०१४-१५ साली १०१ जणांवर कारवाई करीत १५ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, डिसेंबर २०१७ अखेरी पर्यंत ४६ जणांना ७ हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला.   

टॅग्स :PuneपुणेFDAएफडीएSmokingधूम्रपान