शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या हव्यासापोटी बापाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 07:02 IST

मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले.

यवत/जेजुरी : भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या ओमशांती मठात झालेल्या खून हा जमिनीच्या हव्यासापोटी करण्यात आला असून तो मयत व्यक्तीच्या मुलानेच केला असल्याचे गुन्हा पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. सुखराज दगडू टेमगिरे (वय ४०, रा. भरातगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. ७ मे रोजी भुलेश्वर येथे ओम शांती बाबा मठातील सेवेकरी दगडू लक्ष्मण टेमगिरे (वय ७०, रा. भरतगाव, ता. दौंड) यांचा खून केला होता.गुन्हे शाखेच्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दगडू टेमगिरे हे अत्यंत मनमिळावू चांगल्या स्वभावाचे तसेच सांप्रदायिक पंथाचे व धार्मिक असल्याने त्यांचे गावात कोणाशी वैर नव्हते. त्यांचा लहान मुलगा सुकराज (वय ४०) यास दारूचे व्यसन असून त्याने वडिलांच्या नावे असलेली जमीन ही गावातील एका इसमास विकण्याचे कबूल करून त्याच्याकडून विसार रक्कम घेतली होती. परंतु, त्याचे वडिलांचा जमीन विकण्यास विरोध असल्याने ते कागदपत्रावर सही करत नव्हते. यातूनच आरोपी सुखराज टेमगिरे याने सायंकाळी मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले. वडील प्रतिकार करू लागल्यावर त्यांच्या तोंडावर उशी ठेऊन त्यांचा खून केला. पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता जमिनीच्या हव्यासापोटी वडिलांचा खून केल्याचे कबूल केले.पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. यात गुन्हे शाखेचे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, दयानंद निम्हण, अक्षय जावळे यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :Murderखून