शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप, वाढला उन्हाचा ताप!

By admin | Updated: April 21, 2015 03:02 IST

उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते. असह्य चटक्याने नागरिक आणि

पिंपरी : उन्हाचा झळा वाढल्याने आज सोमवारी दुपारी घराबाहेर पाऊल ठेवणे अवघड झाले होते. असह्य चटक्याने नागरिक आणि वाहनचालक पोळून निघाले. तळपत्या उन्हामुळे रहदारी तुरळक झाली होती, तर काही भागात रस्ते ओस पडले होते. थंड पेय, सरबत पिऊन शरीराची लाही लाही कमी करताना प्रयत्न काहींनी केला. मात्र, त्याचा फारसा फरक पडला नाही. रविवारपासून उन्हाच्या झळा वाढल्या. सकाळपासून वातावरणात गरम वारे वाहत होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा अधिक झाला. बाहेर ऊन अधिक दिसत नव्हते. काहीसे ढगाळ वातावरण होते. मात्र, उन्हाचा झळा असह्य होत्या. पादचारी आणि वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वार, रिक्षा व टेम्पोचालकांना त्याची तीव्रता जाणवली. उन्हाच्या चटक्याने नागरिक अक्षरश: पोळून निघाले. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घामाच्या धारा रुमालाने टिपल्या जात होत्या. घशाला कोरड पडत होती. रस्त्याकडेच्या टपरीवर लिंबाचा रस, लस्सी, उसाचा रस, नीरा, ताक, थंड पेय, नारळ पाणी पिण्यास पसंती दिली जात होती. तसेच, आईस्क्रीम आणि कलिंगड खाल्ले जात होते. त्यामुळे थोडासा दिलासा मिळत होता. मात्र, प्रचंड उकाड्याने थोड्या वेळाने पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीने नागरिक हैराण झाले होते. उन्हाच्या झळ्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी दुपारी वाहने रस्त्यावर न काढता घरीच किंवा कार्यालयात थांबणे पसंत केले. यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक होती. काही रस्ते तर ओस पडले होते. रस्त्याकडेच्या झाड्याच्या सावलीत दुचाकीस्वार थांबून विश्रांती घेत होते. हेल्मेट आणि टोपीतून घामाच्या धारा वाहत होत्या. (प्रतिनिधी)