शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

खेड तालुक्यात अडीच लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भाग्य

By admin | Updated: January 23, 2017 02:34 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. खेड तालुक्यात

दावडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ गट व पंचायत समितीचे १४ गण असून, २ लाख ४५ हजार ३९ मतदार आहेत. हे अडीच लाख लोक उमेदवाराचे भाग्य ठरविणार आहेत.तालुक्यात पुरुष मतदार १ लाख २८ हजार ९६९ आहेत. तर १ लाख १६ हजार ७० स्त्री मतदार आहेत. पंचायत समितीचे गण मतदारसंख्या पुढील प्रमाणे : नायफड (१८००७), वाशेरे (१९ हजार ५२४), वाडा (१९ हजार ७१०), कड़ुस (१७ हजार ४७६), पाईट (१९ हजार ८२०), पिंपरी बु. (१७ हजार ६८१), नाणेकरवाडी (९ हजार ६८१), महाळुंगे (११ हजार ९५७), चऱ्होली (१५ हजार ९५८), कुरुळी (१४ हजार १६१), पिंपळगाव तर्फे खेड (१९ हजार ८६८), रेटवडी (२१ हजार ३१४), सांडभोरवाडी (२१ हजार ३१८), काळुस (१८ हजार ५६४). आचारसंहिता लागू झाल्यापासून तालुक्यातील प्रत्येक गणातील व गटातील इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर होण्याअगोदरच आपल्यालाच तिकीट मिळणार आहे, असे मतदारांना सांगत आहे. काही इच्छुक उमेदवार आपल्या गटातील युवकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करून रात्रभर अपडेट राहत आहेत. खेड तालुका राजकीयदृष्टया अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा निवडणुकीदरम्यान या तालुक्याच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच संबंधित गट व गणातील इच्छुकांनी आपले दौरे सुरु केले आहेत. सर्वसामान्यांना कधीही न दिसणारे व बंद काचेच्या आलिशान वाहनातून फिरणारे इच्छुक मात्र आता जमिनीवर आले आहेत. सर्वसामान्यांपुढे हात जोडून पाया पडत आहेत. अनेक इच्छुकांची फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. कधीतरी मतदारसंघात दिसणारे नेते इच्छुक दररोज दिवस सुरू होताच गावागावात धुराळा उडवत जात आहे. (वार्ताहर)