शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर, शेतकरी, विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:03 IST

ओतूर  परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे .

ओतूर  - परिसरातील ओतूर, अहिनवेवाडी, चार पडाळी, सारणी, तांबेमळा, ढमालेमळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले व कळपाने फिरत असल्याने शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी यांनी बिबट्यांंची दहशत घेतल्याने संपूर्ण परिसर भीतीच्या सावटाखाली वावरत आहे .ओतूर परिसरातील अमिर घाट येथे दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता उसाशेजारील शेतात मेंढपाळ मेढ्या चारत होते तेव्हा या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला कळपातील एका मेंढीला जखमी करून एक मेंढा ठार केला व बिबट्या मेंढा घेऊन पळाला. मेंढपाळांनी आरडाओरडा केल्याने तेथील स्थानिक शेतकरी भरत शेटे धावत आले इतर शेतकरी ही धावत आले मेंढपाळ व शेतकऱ्यांनी बिबट्या ज्या दिशेने पळाला त्याचा पाठलाग केला तेव्हा एका शेतात बिबट्याचा घोळकाच दिसल्यावर ते थांबले आरडाओरडा केली तेव्हा दोन बिबटे दोन बछडे उसाच्या शेतात पळाले.या घटनेची माहिती ओतूर वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे विशाल अडागळे वनमजूर फुलचंद खंडागळे तेथे तत्काळ हजर झाले. पंचनामा करतांना तेथे बिबट्याचे पायांचे ठसे दिसून आले. जुन्नर तालुक्यातील सोशल मीडियावर पट्टेरी वाघाची बातमी मेसेज फिरताना दिसून येतो. तसेच बिबट्यापासून संरक्षण असा व्हिडीओ दाखवले जात आहेत. या विभागात पट्टेरी वाघ नाही वाघसदृश तरस असावे. सोशल मीडियावर जे दाखवले जाते त्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वनविभागाचे कर्मचारी म्हणाले. या परिसरातील शेतकरी भरत शेटे म्हणाले बिबट्याच्या दहशीतीमुळे शेतमजूर कामाला येत नाहीत, दिवसा बिबट्या हल्ले करू लागले आहेत ते झुंडीने फिरतात कधी एक कधी दोन तर कधी जोडीने बछडे दिसतात वन विभागाने पिंजरा लावावा.सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश डुंबरे म्हणाले, वनविभागाने बिबट्या पासून संरक्षण याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण या विभागात अनेक हल्ले झाले आहेत. बनकर फाटा ते बल्लावाडी गणपती फाटा येथे दुचाकीवरून जाणाºया चालक महिला यांना गंभीर जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.वनविभागाने बसविला विठ्ठलवाडीत बिबट्या पकडण्यासाठी पिंजरातळगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील मिरगव्हाण वस्तीवर ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने अखेरीस बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला. गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील मिरगव्हाण वस्तीवर उच्छाद मांडला होता. दोन कुत्री व शेळी खावून फस्त तर केली होती.बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मिरगव्हाण परीसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते .मारुती धोंडीबा गवळी यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला केला परंतु तिने प्रतिकार केल्याने ती बचावली. विकास कोंडीबा कातोरे यांच्या शेतामध्ये एका पाळीव कुत्र्याचे अवशेष आढळून आले तर दिलीप हंबीर यांच्या गोठ्यातून एक शेळी बिबट्याने फस्त केली. किरण कातोरे यांच्या कुत्र्यावरही हल्ला करून त्याला मारले होते. मिरगाव वस्तीवरील अशोक चव्हाण हे रात्रीच्या वेळी शेताचे काम उरकून ट्रॅक्टरने घरी येत असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच दीपक गवारी, योगेश गवारे, गुरुनाथ गवारी यांनाही या बिबट्याचे दर्शन झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाने याची दखल घेत मिरगाव परिसरात पिंजरा लावला. यावेळी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अंकुश गवारी, युवराज कातोरे, दीपक गवारी, उद्धव गवारी, सोपान हंबीर, भूषण गवारी, अप्पासोा कातोरे, चंद्रशेखर कातोरे, वनकर्मचारी बाबा घोलप आदी उपस्थित होते.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे