शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा

By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST

शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा,

खळद : शेती व ग्रामीण भागातील बदलत्या तंत्राची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने कृषी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन शिवतारे यांच्या हस्ते सासवड येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषिविकासाच्या नवनवीन पद्धतीचा उपयोग पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना होण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी जैविक तंत्रज्ञान, फलोत्पादन तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, सामाजिक वनीकरण, वाहतूक व कृषी उत्पादन हाताळणी, दळणवळण तंत्रज्ञान, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, साठवण गोडाऊन, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बाजार, कृषी अर्थसाहाय्य, कृषी संशोधन, ग्रामीण विकास, सहकार चळवळ, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादन व पशुसंवर्धन, याचबरोबर शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दिलीप यादव, निमंत्रक म्हणून भूषण ताकवले यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी आबा भोंगळे, अतुल म्हस्के, उमेश गायकवाड, रघुनाथ बोरकर, विवेक दाते, दत्तात्रय शिवतारे, सचिन भोंगळे, कुणाल जगताप आदी उपस्थित होते. (वार्ताहर)