शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिरडल्याने शेतकरी महिला ठार

By admin | Updated: March 28, 2017 02:03 IST

रोकडोबादेवाच्या यात्रेला बिरदवडी येथे पायी निघालेली शेतकरी महिला ट्रक आणि बसच्यामध्ये चिरडली गेल्याने

आसखेड : रोकडोबादेवाच्या यात्रेला बिरदवडी येथे पायी निघालेली शेतकरी महिला ट्रक आणि बसच्यामध्ये चिरडली गेल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना चाकण येथील आंबेठाण चौकात सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली, तर अन्य एक पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली.छाया ऊर्फ बेबी संभाजी डफळ (वय ५३, रा. गवंडीवस्ती, धामारी, ता. शिरूर) असे या अपघातात ठार झालेल्या पादचारी शेतकरी महिलेचे नाव आहे, तर पुतिलाल रामसेवक (रा. दावडमळा, चाकण) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. संदीप शिवाजी जाधव (वय ४२, रा. बिरदवडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव जाणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ४३६९) व आंबेठाण बाजूकडून आलेला व पुणे बाजूकडे वळणारा ट्रक (एमएच १४ ईएम ८३२४) या दोन वाहनांच्या मध्ये आंबेठाण दिशेने निघालेल्या पादचारी शेतकरी महिला डफळ ह्या अडकल्या आणि दोन्ही वाहनांमध्ये चिरडून डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाल्या.चाकण ग्रामीण रुग्णालयात संबंधित महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नातेवाइकांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सोमवारी बिरदवडी गावाची यात्रा असल्याने छाया ऊर्फ बेबी डफळ या धामारी येथून यात्रेसाठी आल्या होत्या. मात्र, यात्रेला जाण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ उपचारांसाठी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. छाया डफळ या चाकण एसटी बसस्थानकावरून शिवाजी चौकमार्गे आंबेठाण चौकातून पुढे बिरदवडी येथे रोकडोबा देवाच्या यात्रेनिमित्त नातेवाइकांकडे जात होत्या. त्यातच काळाने त्यांच्यावर झडप घातली. तसेच रामसेवक हा पादचारी तरुणही या वाहनांच्या मध्ये अडकून गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर येथील जयहिंद दवाखान्यात अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा ट्रकचालकासह एसटीचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.