शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे बांधाचे वाद संपुष्टात येणार; नकाशे मोबाइलवर, पहिला प्रयोग वाशिममध्ये

By नितीन चौधरी | Updated: April 4, 2023 12:26 IST

आता जमीन मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांशाचा असेल उल्लेख

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : राज्यात जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद थांबावेत, यासाठी भूमी अभिलेख विभागातर्फे मोजणी नकाशालाच अक्षांश व रेखांशाची जोड देण्यात येणार काही दिवसात शेतकऱ्यांना आपले शेतीचे नकाशे मोबाइलवर पहायला मिळणार आहेत. राज्यातील पहिला प्रयोग वाशिम जिल्ह्यातील गुंज गावात करण्यात आला आहे. तेथे या पद्धतीचा पहिला नकाशा देण्यात आला.

जमीन मोजणीसाठी आता राज्यभर रोव्हर यंत्रांची मदत घेण्यात येत असून, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून या पद्धतीने मोजणी सुरू झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात १५ एप्रिलपासून मोजणीचे काम रोव्हर यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी ९०२ रोव्हर यंत्र राज्याला मिळाली आहेत. त्यातील ५०० यंत्रांची खरेदी नुकतीच करण्यात आली आहे, तर ४०० यंत्रे जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी केली आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६९, तर हिंगोली व धुळ्यात सर्वांत कमी १० रोव्हर यंत्र दाखल झाली आहेत. राज्याला आणखी ७०० ते ८०० रोव्हर यंत्रांची गरज असून, पुढील काही दिवसांत ६०० रोव्हर यंत्र खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वैधता कायमस्वरूपी

- या ऑनलाइन नकाशाची वैधता अक्षांश, रेखांश मिळाल्यानंतर कायमस्वरूपी राहणार आहे. नकाशावरील अक्षांश, रेखांश सर्वांना दिसेल. त्याची पडताळणी करायची असल्यास जीपीएसद्वारे, मोबाइलद्वारे तुमच्या जमिनीच्या मिळकतीच्या सीमा पाहू शकाल.

देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून,  चार ते पाच महिन्यांमध्ये संबंध राज्यांत याची अंमलबजावणी पूर्ण होणार आहे. -निरंजन कुमार सुधांशू, आयुक्त, जमाबंदी व भूमिअभिलेख संचालक

टॅग्स :FarmerशेतकरीMobileमोबाइल