शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:41 IST

ढाकाळे (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. संतोष दत्तात्रय काळे असे या शेतक-याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.

घोडेगाव : ढाकाळे (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत बिबट्याने एका शेतक-यावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. संतोष दत्तात्रय काळे असे या शेतक-याचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.ढाकाळे परिसरात बिबट्याच्या पाऊलखुना यापुर्वीही आढळून आल्या होत्या. दोन दिवसांपासून येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. शनिवारी ढाकाळेमधील एका शेतक-याच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गायीला ठार केले होते. सकाळी संतोष काळे नेहमीप्रमाणे शेतात बैले सोडून घरी जात होते. यावेळी झुडपात लपला असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्याने संतोष काळे घाबरले. झटापटीत ते जमिनीवर पडले. जवळच जमिनीवर पडलेला दगड उचलून त्यांनी बिबट्याच्या दिशेने फेकला. त्यामुळे बिबट्या बाजूला पळाला. याचा फायदा घेत संतोष काळे यांनी पळ काढला व गाव गाठले. गावात येऊन ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. ग्रामस्थांनी त्यांना घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच ढाकाळेमध्ये पिंजरा लावून हा बिबट्या पकडावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.दरम्यान घोडेगाव विभागाचे वनक्षेत्रपाल योगेश महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून संतोष काळे यांची भेट घेतली. तसेच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. काळे यांच्या उपचाराचा खर्च वन विभाग करेल असेही त्यांनी सांगितले.