शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दुष्काळात ‘रोहयो’चा आसरा

By admin | Updated: March 20, 2016 04:42 IST

राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, यंदा प्रथमच तब्बल ४ लाख ८९ हजार ग्रामस्थांनी रोजगार हमीचे काम मिळण्यासाठी प्रशासनाकडे

शेटफळगढे : राज्यासह पुणे जिल्ह्यातदेखील दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून, यंदा प्रथमच तब्बल ४ लाख ८९ हजार ग्रामस्थांनी रोजगार हमीचे काम मिळण्यासाठी प्रशासनाकडे नावनोंदणी केली आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्यास नागरिकांना रोजगार हमी योजनेचा आसरा मिळणार आहे.पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आजपर्यंत २ लाख ११ हजार ६८१ कुटुंबांतील ४ लाख ८९ हजार २४० मजुरांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कामावर केवळ २०८७ मजूर कामावर आहेत. जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ४० कुटुंबांतील ७८ हजार ६७९ मजुरांची नोंद करण्यात आली आहे. तर, सर्वांत कमी नोंद हवेली तालुक्यात झाली आहे. या तालुक्यातील २ हजार १०१ कुटुंबांतील ४ हजार ४४ मजुरांची संख्या आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये कंसात कुटुंबसंख्या, तर कंसाबाहेर मजुरांची संख्या : आंबेगाव (१४७३१) ३६९५२, बारामती (२५७३१) ५७५४१, भोर (१३४३५) ३०४९९, दौंड (१७४९७) ३९९७१, जुन्नर (२९३७४) ७०६५४, खेड (१७९६०) ४०९११, मावळ (६८६७)१४९०९, मुळशी (३४७७) ४६९८, पुरंधर (१६०७९) ३९६६९, शिरूर (२२३७५) ५५३९२, वेल्हा (८०१४) १५३२१ अशी नोंद झाली आहे . वर्षभरातील कामे ४ हजार ५५५ चालू आहेत. त्यामध्येसुद्धा इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ७०० कामे, तर हवेलीमध्ये केवळ ५० कामे आहेत. जिल्ह्यात एकूण ९ हजार ७५४ कुटुंबांतील मजुरांना २ लाख ७७ हजार ८६७ दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. या योजनेतून रस्ते, वृक्षलागवड इत्यादी कामांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची संख्या २०८ आहेत. नोंदणीची संख्या अधिक आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात केवळ २ हजार ८७ मजूर काम करीत आहेत. तर, इंदापूर तालुक्याची आघाडी कायम आहे. त्या ५४ कामे, ६२० मजूर इंदापूर तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ शिरूर ५३ (५४४ मजूर), जुन्नर २३ (१७६ मजूर), बारामती १२ (१४१ मजूर), वेल्हा १७ (९० मजूर), पुरदंर १४ (९७ मजूर), आंबेगाव ११ (१४२ मजूर) आणि भोर ११ (११५ मजूर), खेड ४ (५३ मजूर), हवेली ३ (६ मजूर) आणि मुळशी ३ (२६ मजूर), तर दौंड २ (२८ मजूर) आणि मावळ १ (९) अशी एकूण २०८ कामे सुरू आहेत. (वार्ताहर)सार्वजनिक कामे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेत सार्वजनिक, वैयक्तिक कामांचा समावेश आहे. सार्वजनिक कामांमध्ये पाणंद रस्ते, वृक्षलागवड, फळबाग लागवडीचा समावेश आहे.

वैयक्तिक  कामे वैयक्तिक कामांमध्ये स्वच्छतागृह, सिंचन विहीर, वृक्षसंगोपन, फळबागलागवड, कुक्कुटपालन, शोषखड्डा, गाईगोठा, इंदिराआवास घर आदींचा समावेश आहे. त्यापैकी तुलनेने सार्वजनिक कामांपेक्षा वैयक्तिक कामांकडे अधिक कल असल्याचे चित्र आहे.