शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 07:19 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा : पोलीस वसाहतीसमोर व ज्ञानेश्वर पादुका चौकात रास्ता रोको

पुणे : ऐन नवरात्रोत्सवात शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी वसाहतीबाहेर आणि ज्ञानेश्वर पादुका चौकात रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येथील रहिवाशांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला.

तुर्तास टँकरने पाणी पुरवठा करू आणि पाणी का येत नाही, याबाबत चौकशी करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर संध्याकाळी पाच वाजता वसाहतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. पोलीस लाईन वगळता इतरत्र मात्र पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. मात्र लाईनमध्ये ३ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय रविवारी सकाळी रस्त्यावर आले़ सकाळी ९ ते साडेदहा दरम्यान महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे. त्यानंतर काही वेळ ज्ञानेश्वर पादुका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर यंत्रणेला जाग आली. आंदोलन केल्यानंतर काही तासातच सुमारे २० मिनिट वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला.

दरम्यान सकाळी ९ वाजता सुमारे दीडशे नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला़ त्यावेळी नागरिकांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ त्यावर गिरीश बापट यांनी टँकरने पाणी पुरविले जाईल, असे आश्वासन दिले़ त्यानंतर महिला व इतर नागरिक घरी गेले.

शहराच्या अन्य भागात पाणीपुरवठा होतो. मात्र, शिवाजीनगर पोलीस वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा ही बाब नित्याची झाली असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून करण्यात आली.

कालवा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत : नागरिक हैैराणखडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये पूर्वीपासूनच कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत होता. या ठिकाणी दररोज सकाळी ८ ते ९ दरम्यान पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी जलकेंद्रातून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे कारण दिले आहे. वसाहतीत सुमारे १ हजार कुटुंबे असून पाण्यामुळे ते हैराण झाले आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे