शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
5
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
6
 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 
7
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
8
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
9
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
10
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
11
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
12
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
13
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
14
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
15
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
16
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
17
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
18
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
20
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

पालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 1:58 AM

अपात्र उमेदवारांना घुसवले : परीक्षा घेऊनही निकाल जाहीर नाही

पुणे : महापालिकेच्या कारकून भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय पीएमसी एम्प्लॉईज युनियनने व्यक्त केला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांमध्ये सुशिक्षित असलेल्या कर्मचाºयांची संख्या बरीच मोठी आहे. वारसा हक्काने नोकरी मिळत असल्याने शिक्षण असूनही नोकरीची संधी मिळाली की ते लगेच नोकरी स्वीकारतात. त्यानंतर मग वरच्या वर्गात येण्यासाठी प्रयत्न करतात. खात्यांतर्गत परीक्षा घेऊन अशा उमेदवारांना तृतीय श्रेणीत टंकलेखक किंवा कारकून म्हणून सामावून घेतले जाते. त्यासाठी त्यांची सेवेची ५ वर्षे पूर्ण झाली असल्याचे बंधन घालण्यात येते. त्याशिवाय किमान १० वी उत्तीर्ण वगैरे अटीही असतात.अशा २६७ पात्र उमेदवारांची यादी सामान्य प्रशासन विभागाने जून २०१८ मध्ये जाहीर केली. त्यांची २२ जुलै २०१८ रोजी परीक्षा घेतली. परीक्षेस बसता न आलेल्या, कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे अपात्र ठरलेल्या अशा ११७ जणांची एक यादी १२ डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे आणून देण्यास सांगण्यात आले. या यादीत बरीच नावे प्रशासनाने दिलेल्या ५ वर्षे सेवेच्या मुदतीत बसणारी नाहीत.सेवाकाल पूर्ण करत नसलेल्या, अपात्र असलेल्या उमेदवारांना यादीत बसवण्यासाठी म्हणून हा सर्व उपद्व्याप करण्यात आला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. काही नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकाºयांनीच हा खटाटोप केला असल्याची चर्चा आहे. केवळ ५ वर्षांचा सेवाकाल पूर्ण होत नसल्याने ते अपात्र समजले गेले आहेत; मात्र ज्यांचा वशिला आहे ते असा सेवाकाल पूर्ण झाला नसतानाही पात्र समजून तृतीय श्रेणीत जाणार आहेत. युनियनचे अध्यक्ष बापू पवार व सरचिटणीस चंद्रकांत शितोळे यांनी याबाबत आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठवले आहे. पात्र उमेदवारांवर होत असलेला अन्याय त्वरित दूर करण्याची मागणी केली आहे.प्रशिक्षण सत्र पूर्ण४या यादीवर काही जणांनी आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने १३ डिसेंबरला एक शुद्धिपत्रक काढले. त्यानंतर ते शुद्धिपत्रक १४ डिसेंबरला लागलीच रद्द केले.४१५ डिसेंबरला एक परिपत्रक काढले. त्यात ४३ जणांची यादी प्रसिद्ध केली. यातच पुन्हा ५ वर्षांचा सेवाकाल पूर्ण झाला नसलेली नावे घुसडण्यात आली.४त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान हे १३ तासांचे प्रशिक्षण सत्र पूर्णही झाले.

टॅग्स :Puneपुणे