शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध विचार राष्ट्रीय एकात्मतेस घातक : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:00 IST

अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे

पिंपरी : अलीकडच्या काळात राष्ट्रीय विचारांपेक्षा जात्यांध आणि धर्मांध विचारांना अधिक महत्त्व आल्याचे दिसून येते. हे राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे. त्यामुळे एकात्म भारतीय समाजाच्या अक्षरश: चिंधड्या होत आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संवैधानिक मूल्ये समाजाच्या अंतरंगात खोलवर रुजविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने बंधुताचे कार्य खरोखरच महान आहे, असे मत ८९अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि सुरून इंफोकोअर सिस्टिम या संस्थांच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सबनीस यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या वेळी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर, विवेक इनामदार, मधुश्री ओव्हाळ, महेंद्र भारती, सुनील यादव, सर्वेश सोनवणे उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘महापुरुषांना जातीच्या कप्प्यात बंदीस्त करून पुरोगामी विचारांची लढाई लढणे उचित नव्हे. हा सपशेल खोटारडेपणा आहे. त्यांच्या प्रगतिशील विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे.’’प्रकाश रोकडे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंकर आथरे यांनी केले. सर्वेश सोनवणे आणि सुनील यादव यांनी संयोजन केले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीस