आळेफाटा उपबाजारात मंगळवार (दि. 8) रोजी झालेल्या कांदा लिलावात कांदा दरात घसरण झाली. दहा किलो कांद्यास 225 असा दर मिळाला असल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.
आळेफाटा येथील उपबाजारात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कांदा दरात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या महिन्याचे पहिल्या आठवड्यात हे दर दहा किलो 260 रूपयांवर गेले होते. आज मात्र या दरात घसरण झाली. 19 हजार तीनशे कांदा गोणी येथे विक्रीस आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने अनलाॅक जाहीर केल्याने सर्वत्र कांदा लिलाव सुरू झाल्याने कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण वाढले असून त्यातच परराज्यांतून कांद्यास मागणी कमी झाल्याने दर घसरल्याचे कांदा आडतदार व्यापारी संजय कुऱ्हाडे व जीवन शिंदे यांनी सांगितले.
प्रतवारीप्रमाणे मिळालेले दहा किलो दर असे- नंबर कांदा एक 180 ते 225 रुपये, दोन नंबर कांदा 130 ते 180 रुपये ,तीन नंबर कांदा 70 ते 130 रुपये.