शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

लोणीकंद केंद्रात बिघाड; वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:09 IST

महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी १ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील २२0 केव्ही व १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.

पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी १ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील २२0 केव्ही व १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले. परिणामी शहरातील काही भागांसह पिंपरी-चिंचवड, भोसरी तसेच चाकण, सणसवाडी, रांजणगाव एमआयडीसीसह ग्रामीण भागातील काही शहरे व गावांमध्ये दुपारी २३ मिनिटे ते सव्वा तासापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.महापारेषणच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात दुपारी १.0६ वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या उपकेंद्रातून वीजपुरवठ्यासाठी अवलंबून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या तब्बल २९ उपकेंद्रांचासुद्धा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये ४00 केव्ही लोणीकंद, चाकण उपकेंद्र तसेच २२0 केव्ही भोसरी, चिंचवड, टेल्को, चाकण इंडस्ट्रिीाल फेज टू, थेऊर, फुरसुंगी, सेरम, मगरपट्टा, रांजणगाव, मुंढवा, गणेशखिंड, एनसीएल, आंबेठाण, मरकळ, सणसवाडी, जॉनडिअर, एस्सार, निओसीम, बेकॉर्ट, व्हर्लपूल, फियाट व कल्याणी या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला. उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारी २.२७ वाजेपर्यंत सुरू झाला.>वीजपुरवठा खंडीत झाल्याने पुणे शहरातील प्रामुख्याने नगरस्ता, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, गणेशखिंड, शिवाजीनगर, औंध, मगरपट्टा, खराडी, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, वाघोली, हडपसर, बंडगार्डन, कोथरूड, वाकड, वारजे, पाषाण, बावधन, सुस रोड, कोंढवा, कात्रज आदी भागांचा वीजपुरवठा एका तासापर्यंत खंडित होता.