शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटसचिवांवर अतिरिक्त भार; कर्जमाफी कामांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:41 IST

राज्यात २१ हजार सोसायट्या; केवळ ७ हजार सचिव

- सतीश सांगळे कळस : गावातील विकास सोसायटी हा गावाचा आर्थिक कणा मानला जातो. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. राज्यातील या विकास सोसायट्यांची संख्या सुमारे २१ हजार आहे. यासाठी केवळ सात हजार सचिव सध्या कार्यरत आहेत. अनेक गटसचिवांकडे तीन ते पाच सोसायट्यांचा अतिरिक्त कारभार आहे. यामुळे सोसायटीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. कर्जमाफी प्रक्रियासह अन्य कामांवर ताण येत आहे. त्याचा परिणाम शेती आणि शेतकºयांवर होत आहे.जिल्हा बँका सोसायटीला कर्ज देते. सोसायटीमार्फत शेतकºयांना कर्जपुरवठा होतो. मात्र, सोसायटीच्या मार्फत दिलेल्या कर्जाची वसुली वेळेत होत नाही. यामुळे जिल्हा बँकेचा एनपीए वाढू लागला आहे. यामुळे सोसायटीला पीककर्जाची मर्यादा कमी केली आहे. परिणामी भविष्यात सोसायट्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. सचिवांची कमतरता असल्याने काम करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे.सन २०१०-११ मध्ये शासनाने वैद्यनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. त्या वेळी शासनाने राज्य आणि जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विकास सोसायटी आणि नाबार्ड यांच्यात करार झाला. या करारात संवर्गीकरण कायदा हा ६९ (क) रद्द करून ६९ (ख) समाविष्ट केला. ६९ (ख) नुसार राज्य आणि जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. त्या समितीच्या माध्यमातून सचिवांच्या सेवा आणि वेतनाच्या उद्भवणाºया समस्या सोडविण्याचे आणि मार्ग काढण्याचे काम ही समिती करते. तसेच सध्या राज्यात कार्यरत असणाºया संवर्गीकरण निधी योजनेतील गटसचिवांचे अस्तित्व त्यावेळच्या शासनाने अबाधित ठेवले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोसायटींच्या सचिवांची भरती रखडली आहे. परिणामी शेतकºयांची माहिती वेळेत दिली जात नाही. यामुळे सचिवांची भरती करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार ६९ (ख) लागू केल्याने ही भरती जिल्हास्तरीय समितीला सचिव भरण्याचा अधिकार दिला आहे.भरतीप्रक्रिया बंदचजिल्हास्तरीय समिती अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधक सदस्य, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि गटसचिव संघटनेचे दोन प्रतिनिधी अशी नवीन समितीची रचना आहे. जिल्हा समितीची सचिव भरती प्रक्रिया काही वर्षांपासून बंद आहे. मात्र, युनियन संस्था वर्ग करत असताना सचिवांसह नेमणूक करण्यात आली आहे. काही संस्थांनी परस्पर भरती केली आहे. आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. भरतीप्रक्रिया ही बंदच आहे.- श्रीराम थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी, केडर पुणे