शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

डीएसकेंना पैसे भरण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 04:57 IST

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती.

मुंबई : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. ही मुदत संपण्यास काही तास उरले असताना डी. एस. कुलकर्णी यांनी अटकेपासून बचाव करण्याकरिता पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत, ही मुदतवाढ अंतिम असेल, असेही बजावले. त्यामुळे सोमवारपर्यंत डीएसकेंची अटक टळली आहे.लोकांना त्यांचे पैसे परत हवे आहेत म्हणून त्यांना तुमची अटक नको आहे. तुम्हाला कारागृहात पाठवून त्यांना पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला व्यवसायात झालेल्या नुकसानीशी गुंतवणूकदारांचे काहीही घेणे-देणे नाही, अशा शब्दांत न्या. साधना जाधव यांनी डीएसकेंना सुनावले. डीएसके यांना गुंतवणूकदारांचे पैसे न्यायालयात जमा करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देताना न्या. जाधव यांनी या प्रकरणातील तपास अधिकाºयांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले. गुंतवणूकदारांचे किती पैसे द्यायचे आहेत, याची माहिती सादर करण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले.यापूर्वीही डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्या वेळी न्यायालयाने गुंतवणूकदारांना परत करायचे असलेल्या २०० कोटी रुपयांपैकी ५० कोटी रुपये डीएसकेंना १९ डिसेंबरपर्यंत भरण्याची अखेरची मुदत दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत डीएसके ही रक्कम न्यायालयात जमा करू न शकल्याने उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेत पोलिसांचा कारवाईचा मार्ग मोकळा केला. परंतु, डीएसकेंनी याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी भरण्याचा आदेश दिला. मात्र, या मुदतीतही डीएसके ही रक्कम जमा करू न शकल्याने त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली.