शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खोर यात्रेची उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:35 IST

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : लोकनाट्य कार्यक्रमाला शेकडोंची उपस्थिती

खोर : खोर (ता. दौंड) येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब, श्री काळभैरवानाथ व तुकाईमाता यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. गुरुवारी सकाळी श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता यांचा महाअभिषेकाने यात्रेच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली. त्यानंतर हळदी कार्यक्रम झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास श्रींंचा लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर खोर गावठाणमधून श्रीनाद ढोल पथक विठ्ठलवाडी यांच्या ढोल पथकाने वाजतगाजत व फटाक्यांंच्या आतषबाजीत श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा संदलचा कार्यक्रम पार पडला.

शुक्रवारी मुख्य यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी मंगला बनसोडे-नितीन बनसोडे करवंदीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सकाळी मंगला बनसोडे-नितीन बनसोडे करवंदीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम झाला. रविवारी हजरत ख्वाजा राजबक्सार पीरसाहेब यांचा सकाळी चादरचा कार्यक्रम पार पडला आणि खोर यात्रेची सांगता झाली. नागरिकांमध्ये यात्रेप्रति भक्तिभाव असला तरी व्यापाऱ्यांत मात्र दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात खोरचा यात्रा उत्सव पार पडला. या प्रसंगी बाजार समिती सभापती रामचंद्र चौधरी, सरपंच सुभाष चौधरी, उपसरपंच विकास चौधरी, सुहास चौधरी, पांडुरंग डोंबे, गणेश साळुंंके, दिलीप डोंबे, मोहन डोंबे, बाळू डोंबे, भगवान चौधरी, राहुल चौधरी, विजय कुदळे, भानुदास डोंबे, दिलीप डोंबे, प्रकाश चौधरी, यात्रा कमेटी, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.खोरचा चौधरी ठरला आखाड्याचा मानकरी...शुक्रवारी सायंकाळी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. त्यामध्ये दौंड, नगर, कर्जत, वरवंड, पाटस, बारामती, श्रीगोंदा येथील नामांकित पैलवानांंनी हजेरी लावली. शेवटची कुस्ती पै. सागर चौधरी (खोर) विरुद्ध पै. प्रताप हेगडे (वरवंड) यांच्यात झाली. त्यामध्ये सागर चौधरीने प्रताप हेगडेला आसमान दाखवत आखाड्याचा मानकरी होण्याचा मान पटकाविला. सागरला दहा हजरांचे इनाम देण्यात आले. आखाड्याचे समालोचन मेहबूब पठाण व योगेश शिंदे यांनी केले, तर शिवाजी पिसे, राजू डोंबे, भिकू चौधरी, पपन चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. 

टॅग्स :Puneपुणे