लोकमत न्यूज नेटवर्कमहाळुंगे : एक्सव्हेटर मशिनरीसाठी लागणाऱ्या असेंब्ली वस्तूसह एमसीयू या महागड्या पार्टस्ची चाकण औद्योगिक क्षेत्रातील खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ह्युंदाई कंपनीच्या आवारातील स्टोअर रूममधून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण दहा लाख अठ्ठावन हजार आठशे बावन्न रुपये किंमत असलेल्या या महागड्या पार्टस्च्या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बुधवारी (दि.२१) चाकण पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली. बादशाह इब्राहिम मिरदे (वय २८, रा. काकडे पार्क, चिंचवड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिरदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप अधिक तपास करीत आहेत
कंपनीच्या स्टोअरमधून महागड्या वस्तंूची चोरी
By admin | Updated: June 26, 2017 03:37 IST