शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

प्रशस्त रस्ते, तरीही वाहतूककोंडी!

By admin | Updated: February 24, 2016 03:32 IST

शहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत.

- नीलेश जंगम,  पिंपरीशहरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक कुटुंबामागे नव्हे, तर व्यक्तीमागे एक वाहन इतके प्रमाण वाढले आहे. दशकभरात तब्बल पाचपटीने वाहने वाढली आहेत. त्यामुळे प्रशस्त रस्ते अशी ओळख असलेल्या शहरामधील नागरिकांना सातत्याने वाहतूक-कोंडीला सामोरे जावे लागत आहे.पाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी अशा सणांचे औचित्य साधून लोक वाहने खरेदी करीत असतात. याशिवाय वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे निमित्तही वाहनखरेदीला सोडले जात नाही. यामुळे वाहनसंख्येत वाढ होत चालली आहे. सार्वजनिक वाहतूक न वापरता लोक खासगी वाहतूक सुविधेला जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ कामासाठी, हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा लोकांना वाहनाची सवय झाली आहे. परिणामी वाहतूक कोंडीत वाढ तर झाली आहेच, शिवाय अपघातही वाढू लागले आहेत.निगडी-तळवडे रस्ता, फुगेवाडी ते खडकी, रावेत-औंध रस्ता, भोसरी-मोशी या रस्त्यांसह वाकड, हिंजवडी, भोसरी, देहूरोड या प्रमुख उपनगरात तसेच, नाशिक फाटा, काळेवाडी फाटा, चापेकर चौक, साने चौक या चौकांमध्ये सुद्धा वाहतूककोंडी ही नित्याचीच समस्या झाली आहे. कमीत-कमी अंतर कापण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत आहे. शहरात नोकरी,व्यवसाय व शिक्षणासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून लोक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली व वाहनांची संख्याही वाढली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) हद्दीत लोणावळा ते दापोडी, हिंजवडी, मान ते राजगुरूनगर, मंचर या सर्व भागांचा समावेश होतो. या भागातील वाहनांची नोंदणी चिखलीतील आरटीओत होते. एप्रिल २००२ ते मार्च २००३ या आर्थिक वर्षात आरटीओ हद्दीत दोन लाख ३६ हजार ८०१ दुचाकी, ६० हजार ६९८ चारचाकी वाहनसंख्या होती. २०१४-१५ या वर्षात दुचाकींची संख्या ९ लाख ६५ हजार ७१२ तर, चारचाकी वाहनांची संख्या ३ लाख २६ हजार ८४ पर्यंत पोहोचली. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत १३ वर्षांत तब्बल पाचपट वाढ झालेली दिसून येत आहे. खासगी वाहनांचा वापर वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, तापमान व प्रदुषणातही वाढ होत आहे. शाळा आणि महाविद्यालयात असतानाच पाल्यास पालकांकडून वाहने दिली जातात. शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते व अपघातांचे प्रमाणही वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची, गरज भासू लागली आहे.- महेंद्र रोकडे, सहायक आयुक्त वाहतूक विभागसार्वजनिक व्यवस्था सक्षम करण्याची गरजबस, रेल्वेसोबत भविष्यातील रिंग रोड, मेट्रो, ट्रॉमा आदी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तरच, स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.