शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कलाकारांचे हिंदीत खच्चीकरण

By admin | Updated: January 14, 2017 03:30 IST

मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत

पुणे : मराठी आणि हिंदी चित्रसृष्टीमधील वातावरणात बराच फरक जाणवतो. मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर हिंदी चित्रसृष्टीत वावरताना काहीसे दडपण यायचे. मराठी अभिनेत्रींना भाषेचा प्रश्न आड येत असावा. आजच्या अभिनेत्री हिंदी चांगल्या प्रकारे बोलतात; मात्र हिंदी चित्रसृष्टीत मराठी माणसाचे खच्चीकरण केले जाते. मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करीत असताना आजूबाजूचे लोक नैैराश्य निर्माण करीत असल्याने दडपण यायचे. त्यामुळे अभिनेत्रींना अवघडल्यासारखे होत असावे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी व्यक्त केले. ‘हल्लीचे मराठी चित्रपट आशयसंपन्न आहेत, याबद्दल दुमत नाही. मात्र, नवोदित मराठी तारकांनी हिंदीत जाताना पुरेशी तयारी करून जावे’, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सीमा देव आणि रमेश देव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि श्रीरंग गोडबोले यांनी देव दाम्पत्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, रमेश देव व सीमा देव यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पॅव्हेलियनचे उद्घाटन करण्यात आले. सीमा देव यांनी राजाभाऊ परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रयींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘सुवासिनी’, ‘जगाच्या पाठीवर’ या गाजलेल्या चित्रपटांचे अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, ‘‘आजच्या आणि पूर्वीच्या कामाच्या पद्धतीत बराच फरक जाणवतो. राजाभाऊ स्वत: अभिनय करून, ओरडून भूमिका समाजावून सांगायचे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी तयार झाले. आजवर मिळालेल्या सर्व यशाचे श्रेय त्यांनाच जाते. राजा ठाकूर, मधुकर पाठक, धर्माधिकारी यांच्यासह काम करतानाही चांगले अनुभव मिळाले.’’‘अभिमान’ चित्रपटाचा विषय निघताच सीमा देव म्हणाल्या, ‘‘मी आणि रमेश दोघांनीही अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळविले. अशा वेळी अहंकार दुखावला जाऊन मतभेद होऊ शकले असते; मात्र आम्ही तसे होऊ दिले नाही. संसाराची घडी विस्कटू नये आणि मुलांवर परिणाम होऊ नयेत, यादृष्टीने एकमेकांना समजून आजवरचा प्रवास केला.’’ (प्रतिनिधी)