निमगाव म्हाळुंगी ( ता.शिरूर) येथील विद्या विकास मंदिरच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. रावसाहेब करपे, संचालक बाजीराव रणसिंग,पोलीस पाटील किरण काळे,प्राचार्य दिलीप पवार, बबईताई टाकळकर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दिनकर धुमाळ, लताताई चव्हाण,अधीक्षक झेंडू पवार तसेच शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, रांजणगाव गणपती (ता.शिरूर)येथील श्री महागणपती करियर अकॅडमीत प्रजासत्ताकदिनी पिंपरी दुमालाच्या माजी आदर्श सरपंच गायत्री चिखले यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, अकॅडमीचे संचालक राजेंद्र टेळे तसेच स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी साठी आलेले विद्यार्थी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते. यावेळी पलांडे यांनी स्पर्धापरीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, अथक परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे असे सांगितले.
-------------------------------------------------------
फोटो ओळी : २७रांजणगाव गणपती
फोटो : निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिरच्या प्रांगणात ध्वजारोहण नंतर मार्गदर्शन करताना माजी आमदार सूर्यकांत पलांडे