शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संस्कृतीचे आदानप्रदान

By admin | Updated: January 2, 2017 02:10 IST

नाट्यकलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नेहमीच विविध नाट्यप्रयोग केले जातात. नवनवीन विषय व नाट्यप्रकार पाहण्याची मेजवानी पुणेकरांना उपलब्ध होत असते.

पुणे : नाट्यकलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात नेहमीच विविध नाट्यप्रयोग केले जातात. नवनवीन विषय व नाट्यप्रकार पाहण्याची मेजवानी पुणेकरांना उपलब्ध होत असते. असाच एक अनोखा प्रयोग लवकरच पुण्यनगरीत अवतरणार आहे. या उपक्रमामधून संस्कृतीचे आदानप्रदान करुन वेगळा पायंडा पाडला जाणार आहे. पुण्यातील नाट्यवर्तुळात गवगवा असलेली नाटक कंपनी ही संस्था ‘थिएटर एक्सचेंज’ हा आगळा- वेगळा उपक्रम राबवत असून या उपक्रमाअंतर्गत कोलकात्यातील मॅड (मॅड अबाऊट ड्रामा) हा थिएटर ग्रुप पुण्यात येऊन त्यांच्या ‘अ हिस्ट्री आॅफ बचर्स’ हे नाटक सादर करणार आहेत. नाटक कंपनी त्यांचे ‘आयटम’ हे नाटक कोलकात्यात सादर करणार आहे. थिएटर एक्सचेंजद्वारे कलेचे आदान प्रदान व्हावे व नाट्यरसिकांना पुण्याबाहेरील नाटके पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम नाटक कंपनीने हाती घेतला आहे. आजूूबाजूची सामाजिक, वैयक्तिक, राजकीय, भौगोलिक गोष्टींबाबत नाटकातून भाष्य करण्याचा प्रयत्न होत आहे. नाटक करत असताना, नाटकाच्या भाषेच्या, दृश्य भाषेच्या, रचनेच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्नही यातून केला जातो. ‘मॅड’ हा ग्रूप कोलकात्यातील नाटकवेड्या तरुणांनी सुरु केलेला असून त्यांनी नेहमीच प्रयोगशील व नवीन विषय त्यांच्या नाटकातून हाताळले आहेत. पुण्यात दि. ७ जानेवारी रोजी हा गु्रप अल्बर्ट कामयू यांच्या नाटकावर आधारित ‘अ हिस्ट्री आॅफ बचर्स’ हे दोन अंकी इंग्रजी नाटक सादर करणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अरित्र सेनगुप्ता यांनी केले आहे. नाटक कंपनीच्या सिद्धेश पूरकर लिखित व क्षितीश दाते दिग्दर्शित ‘आयटम’ या नाटकाचा प्रयोग २९ जानेवारी रोजी कोलकत्यात होणार आहे.(प्रतिनिधी)