शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जादा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 04:14 IST

दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरास शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदिलांवरही मनाई कायम करण्यात आली आहे. 

पुणे : दिवाळीच्या उत्साहात मोठे फटाके व १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाºया फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरास शहर पोलीस दलाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर चिनी उडत्या आकाश कंदिलांवरही मनाई कायम करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत दोन तास फटाके उडविण्यास परवानगी दिली असली तरी पुणे पोलिसांनी काढलेल्या आदेशात रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही प्रकारचा ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणाºया फटाक्यांवर संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी हा आदेश काढला असून, ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे़कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही रस्त्यापासून ५० फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारूकाम सोडणे किंवा फेकणे अगर फायर बलून किंवा अग्निबाण सोडण्याला मनाई करण्यात आली आहे.एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाºया फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे़ तसेच फटाक्यांची माळ ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११० /११५ व १२५ डेसिबल ऐवढी असावी़ त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाºया सर्व फटाक्यांच्या माळांवर बंदी घालण्यात आली आहे.आकाशात पेटते आकाशकंदील सोडण्याच्या प्रकारात गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली होती़ असे चिनी आकाशकंदील दिवाळीच्या पहिल्या दिवशी व पाडव्याला सारसबागेसारख्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पेटते आकाशकंदील सोडले जात होते. हे पेटते आकाशकंदील उंच गेल्यावर झाडाला तसेच इमारतीवर पडून आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या़ त्यामुळे शहर पोलीस दलाने गेल्या वर्षी त्याच्या विक्री व वापरावर बंदी घातली होती़ यंदाही या चिनी उडत्या आकाशकंदिलांवर बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेDiwaliदिवाळी