शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

अनोख्या चार्जरचे मिळवले पेटंट

By admin | Updated: January 24, 2017 01:45 IST

मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग झाल्यास बॅटरी खराब होऊ शकते किंवा ब्लास्ट होऊ शकते़

सचिन कांकरिया / नारायणगाव मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगला लावल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग झाल्यास बॅटरी खराब होऊ शकते किंवा ब्लास्ट होऊ शकते़ असे होऊ नये म्हणून जुन्नर तालुक्यातील दोन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी रिमुव्हेबल चार्जिंग पिन मेकॅनिझम हे डिव्हाईस तयार केले आहे. या डिव्हाईसमुळे १०० टक्के बॅटरी चार्जिंग होताच चार्जिंग पिन आॅटोमॅटिक बाहेर येईल, असा शोध लावला आहे़ त्यांच्या या डिव्हाईसला आयपी इंडियामध्ये पेटंट मिळाला आहे़ दोन तरुणांच्या या नावीन्यपूर्ण शोधाचे कौतुक होत आहे़ विशेष म्हणजे, दोन्ही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत़ डी़ वाय़ पाटील स्कूल आॅफ इंजिनिअरिंग येथे तृतीय वर्षात आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग करणाऱ्या नारायणगाव येथील अभिजित मनोहर बनकर व पीडीईएएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग हडपसर येथील तृतीय वर्षात मेकॅनिकल करणाऱ्या व जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील श्रीरंग अंबादास डोके या दोन तरुणांनी रिचेबल बॅटरीमध्ये उपयुक्त असे रिमुव्हेबल चार्जिंग पिन मेकॅनिझम हे डिव्हाईस तयार केले आहे़ हे उपकरण चार्जिंग बॅटरीला जोडल्यास बॅटरी कार्यक्षमतेने चार्जिंग होते व बॅटरी ब्लास्ट होण्यापासून वाचते़ या डिव्हाईसचा उपयोग मोबाईल, लॅपटॉप, एमपीथ्री प्लेअर, वाय-फाय स्पीकर व इतर सर्व रिचार्जेबल डिव्हाईसमध्ये होऊ शकतो़ या उपकरणाचा उपयोग सरंक्षणक्षेत्रातही होऊ शकतो, असा दावा बनकर व डोके यांनी केला आहे़ हे डिव्हाईस बनविण्याची संकल्पना कशी सुचली, याबाबत लोकमतशी बोलताना अभिजित बनकर म्हणाले, की आपला मोबाईल चार्जिंगला लावला होता़ चार्जिंग पूर्ण होऊनही चार्जिंग सुरूच राहिल्याने बॅटरी खराब झाली़ यावरून आपण यावर काहीतरी उपाययोजना करू शकतो, अशी संकल्पना सुचली व आपला मित्र श्रीरंग डोके याच्या सोबतीने आॅगस्ट २०१६मध्ये संशोधनाला सुरुवात केली़ (वार्ताहर)