शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

' रेड झोन' वगळता धनकवडीतील उर्वरित भागात निर्बंध शिथील करा, नागरिकांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:54 IST

धनकवडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा होती. त्यामधील दहा रूग्ण पूर्णपणे बरे झाले.

ठळक मुद्देमुख्य मार्ग अत्यावश्यक सेवेसाठी खुला असावा नागरिकांची अपेक्षा. 

धनकवडी : शहरासह उपनगरांतही बाधीत झालेले रूग्ण बरे होत आहेत. धनकवडीत तेरा कोरोना बाधीत रूग्ण असल्यामुळे रेड झोनमध्ये समाविष्ट झालेल्या भागातील दहा रूग्ण बरे झाल्यानंतर बंधनं शिथील व्हावीत अशी मागणी होत आहे. किमान जानुबाई पथ हा धनकवडीचा मुख्य मार्ग खुला व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.धनकवडीत गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांच्या एकूण संख्येने नागरिकांच्या मनात धास्ती वाढली होती. परिणामी गुलाबनगर आणि चैतन्यनगर हा भाग रेड झोन घोषित करण्यात आला. मुख्य रस्ता जानुबाई पथ गुलाबनगर चौक आणि शेवटचा बस थांबा बंद झाला. गावठाणातील महापालिकेचा दवाखाना, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचे क्लिनिक यांच्याकडे जाणाऱ्या रूग्णांना अडथळा झाला. प्रशासकीय अत्यावश्यक सेवा, महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थेतील वाहने, घनकचरा व्यवस्थापनातील वाहने,  कचरा संकलक यांच्यासाठीही अडचणीचे ठरते आहे. दरम्यान धनकवडीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा होती. त्यामधील दहा रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जे दोन रुग्ण शिल्लक आहे त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. नागरिकांकडून देखील प्रशासनाला सहकार्य केले जात असून रेड झोनमधून वगळून धनकवडी परिसरातील बंधने शिथील व्हावीत अशी मागणी होत आहेत. .................माझे क्लिनिक धनकवडी शेवटचा बस थांबा परिसरात आहे. क्लिनिक कडे जाणारे बहुतांश रस्ते बंद आहेत. अशा परिस्थितीत क्लिनिक मध्ये अँडमिट पेशंट ला तातडीची मदत लागल्यास किंवा इमर्जन्सी आल्यावर आम्ही जायचे कसे अशा सामान्य प्रश्नाचे उत्तर कोण देणार.- डॉ. प्रवीण दरक ..........................गल्लीबोळातील रस्ते ठिक आहेत पण कृपया मुख्य रस्ता बंद करताना विचारपूर्वक बंद करावेत व अत्यावश्यक सेवेतील कर्मचा?्यांना पयार्यी व्यवस्थेची माहीती द्यावी. प्रभागातील अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या रोज समजली तर अफवा व गैरसमजूतीला आळा बसेल, नागरिकांनी सुद्धा अती आवश्यक असेल तरच बाहेर पडावे.दूध फळे भाजीपाला देता घेताना संसर्ग न होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. - प्रिती पासलकर - औषध निर्माण अधिकारी, कै.विलासराव तांबे दवाखाना, धनकवडी.

टॅग्स :DhankawadiधनकवडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका