शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाचे अपहरण करणाऱ्या चौघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:41 IST

माजी सैनिकाच्या घरात घुसून कुटुंबाला शिवीगाळ करत तेथून निघून जाण्याची धमकी देत त्या सैनिकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : माजी सैनिकाच्या घरात घुसून कुटुंबाला शिवीगाळ करत तेथून निघून जाण्याची धमकी देत त्या सैनिकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन पसार होणाऱ्या चौघांना जागीच पकडले आहे. हा प्रकार भरदिवसा कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे. मोहंमद रजा इमदाद अली बुरानी (वय ३५, रा. शिरीन अपार्टमेंट, कॅम्प), खालीद अशरफ रजा (वय ३०, रा. कोंढवा), राम शाम मिरे (वय २४, रा. वडारवस्ती, येरवडा), आशिष मनोहर धोत्रे (वय २५, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, दोघे जण पळून गेले आहेत.याप्रकरणी हेमलता मोरे (वय ६०, रा़ मुगल गार्डन सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना शनिवारी दुपारी घडली़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांचे वडील काशीनाथ चित्ते हे सध्या ८५ वर्षांचे असून ते एअर फोर्समध्ये सुभेदार या पदावरुन निवृत्त झाले आहेत. दरम्यान यातील आरोपी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या घरात घुसले. तसेच, आमचे घर आहे. स्वत:चा हक्क दाखविण्याचे कारणावरून मोरे व त्यांचे कुटुंबाला घरातून बाहेर तत्काळ निघून जाण्यासाठी धमकी देऊन शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्या वडिलांचे मोटारीमधून अपहरण केले. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच कोरेगाव पार्क पोलिसांना देण्यात आली.यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक गणेश माने, कर्मचारी दिनेश शिंदे, विनोद साळुखे, संदीप गायकवाड, रावसाहेब आदर्श व पथकाने तत्काळ धाव घेतली. काही अतंरावरच पोलिसांनी घेराव घालून आरोपींची मोटार अडविली. तसेच, त्यांना पकडून माजी सैनिकाची सुटका केली. कोरेगाव पार्क अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Arrestअटक