शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दररोज एका बलात्काराची नोंद, समाजमाध्यमांतील बदनामीच्या तक्रारींमध्ये पाचपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:42 IST

शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : शहरात दररोज एका अल्पवयीन मुलीवर अथवा महिलेवर बलात्कार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, गेल्या सात वर्षांत या गुन्ह्यांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. समाजमाध्यमांमधून देखील बदनामी केल्याच्या तक्रारींमध्ये तीन वर्षांतच पाचपटींहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.समाजमाध्यमांद्वारे मैत्री वाढवून जवळीक साधून बलात्कार करणे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार करण्याच्या घटनांत वाढ नोंदविण्यात येत आहे. अशा घटनांमध्ये नातेवाईक, ओळखीच्या लोकांचाच जास्त भरणा आहे. काही घटनांत तर जन्मदाता अथवा सावत्र पितादेखील असल्याचे समोर आले आहे.शहरात २०१०मध्ये अल्पवयीन मुलींवरील ८९ अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०१७ अखेरीस तब्बल ३४९ घटनांपर्यंत वाढ झाली आहे. अशा घटनांत २०१५नंतर मोठी वाढ नोंदविली गेली. शहरात २०१५मध्ये २८० आणि २०१६मध्ये ३५४ गुन्हे नोंदविले गेले आहेत.शहरात समाजमाध्यमांद्वारे मुलींची बदनामी केल्याच्या अवघ्या १५२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. डिसेंबर २०१७अखेरीस तब्बल ८८५ तक्रार अर्ज दाखल झाल्याची नोंद सायबर क्राईम विभागाकडे झाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या संख्येची स्वतंत्र नोंद पोलिसांकडे होत नसल्याचे माहिती अधिकारातून दिसून येत आहे. तसेच, महिला अथवा मुलींची बदनामी केल्याच्या घटनांचीदेखील स्वतंत्र नोंद ठेवलेली नाही.>पास्को कायद्याचीकडक अंमलबजावणी आवश्यकशासनाने पुराव्याचा कायदा याकडे दुर्लक्ष करून पास्को कायदा आणला आहे़ त्यातील तरतुदी कडक आहेत़ आरोपीला जामीन मिळण्यातही त्यात अनेक कडक निर्बंध घातले आहेत़ या कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली़ शासन व पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी केली तर अशा घटनांवर नियंत्रण बसू शकेल़- अ‍ॅड़ एऩ डी़ पाटील>सायबर विभागाकडे गतवर्षी ८८५ अर्जसायबर विभागाकडे २०१४पर्यंत अशा तक्रारींची नोंद ठेवण्यात येत नव्हती. त्यानंतर २०१५मध्ये १५२ तक्रार अर्ज सायबर क्राईम विभागाकडे प्राप्त झाले. पुढे २०१६मध्ये ५५२, २०१७मध्ये ८८५ अर्ज दाखल झाले. तर, १५ जानेवारी २०१८ पर्यंत १६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. समाजमाध्यमांत महिला आणि व्यक्तीची बदनामी झाल्याच्या तक्रारीतही वेगाने वाढ होत आहे.वर्ष दाखल गुन्हे२०१० ८९२०११ ७८२०१२ ८५२०१३ १६८२०१४ १८९२०१५ २८०२०१६ ३५४२०१७ ३४९