शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रोजच काढावी लागतेय खड्ड्यांतून वाट

By admin | Updated: March 16, 2017 02:11 IST

काय सांगू साहेब, रात्री बिछान्यावर पडलं ना की परत उठवत नाही. आमचं रोजचंच मरण आहे. या खड्ड्यांमधून गाडी चालविताना खूप कसरत

पुणे : काय सांगू साहेब, रात्री बिछान्यावर पडलं ना की परत उठवत नाही. आमचं रोजचंच मरण आहे. या खड्ड्यांमधून गाडी चालविताना खूप कसरत करावी लागते. रोजच्या गचक्यांनी मानदुखी व पाठदुखीचे आजार जडलेत. खड्ड्यांमधून रोज वाट काढत प्रवाशांना स्वत:च्या जिवावर इच्छितस्थळी सोडणारा चालक हताश होऊन गाऱ्हाणे मांडत होता.पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबर लगतच्या ग्रामीण भागातही बससेवा दिली जाते. मात्र, शहराचा बहुतेक भाग वगळता, उपनगरे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे, तर प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत ‘लोकमत प्रतिनिधीं’नी विविध भागात जाऊन या रस्त्यांची पाहणी केली. बसचालक व प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. धानोरी येथून लोहगावकडे जाताना व वारज्याच्या पुढे शिवणेकडे जाताना रस्त्यात मोठ्याप्रमाणावर खड्डे असल्याने बसचालकांना या भागातून बस चालवावी लागत आहे; तसेच सातत्याने या खड्ड्यांमधून बस जात असल्याने बस खिळखिळ्या होत आहेत व त्यामुळे सातत्याने बस बंद पडणे, पंक्चर होण्यासारखे प्रकार घडत आहेत. धानोरी ते लोहगाव या मार्गावर ‘लोकमत प्रतिनिधी’ने बसने प्रवास केला. धानोरी जकात नाक्यापुढे निकृष्ट दर्जाचा रस्ता असल्याने चालक जीव मुठीत धरून बस चालवत होता. या २ ते ३ किलोमीटरच्या पट्ट्यात १० ते २०च्या वेगाने बस चालवावी लागत होती. त्यातही प्रवाशांना खड्ड्यांमधून जाताना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याचीही काळजी चालक घेताना दिसला. या खड्ड्यांमध्ये बस आदळून खिडकीच्या काचा फुटणे, शॉकआॅपझर खराब होणे, बस पंक्चर होण्यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. याच्या दुरुस्तीसाठी पीएमपीचा मोठ्याप्रमाणावर पैसा खर्च होत असतो. त्यातच बसमार्गावर बंद पडल्यास प्रवाशांच्या रोषालाही चालकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्ते जर दुरुस्त केले, तर या सर्व समस्यांवर उपाय निघू शकेल, अशी आशा नागरिक व चालक व्यक्त करताहेत. त्याचबरोबर या मार्गावर जाण्यास येणारा चालकांचा नकार हा होकारात बदलण्यास मदत होऊ शकेल. टीम लोकमत : राहुल गायकवाड, प्राची आमले, अतुल चिंचली, साजिया शेख