शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय झाला तरी नियोजन उद्याच

By admin | Updated: August 7, 2016 04:34 IST

पुण्याला रोज पाणी देण्याचा निर्णय बऱ्याच कटकटींनंतर झाला असला,तरी तो प्रत्यक्ष राबविण्यास मात्र वेळ लागणार आहे. सोमवारी यासंदर्भातील नवे नियोजन करण्यात येणार असून

पुणे : पुण्याला रोज पाणी देण्याचा निर्णय बऱ्याच कटकटींनंतर झाला असला,तरी तो प्रत्यक्ष राबविण्यास मात्र वेळ लागणार आहे. सोमवारी यासंदर्भातील नवे नियोजन करण्यात येणार असून, त्यानंतरच पुणे शहराला पूर्वीप्रमाणे रोज पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.मागील वर्षी ६ सप्टेंबरला पुण्याला दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय झाला. त्या वेळीही त्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. वाहिन्यांमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन काही ठिकाणी रोज पाणी, तर काही भागांना थेट तीन दिवसांनी पाणी मिळत होते. तीच अडचण आता पाणीपुरवठा पूर्ववत करताना निर्माण होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.वर्षभराच्या पाणीकपातीने त्रासलेल्या पुणेकरांना आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच रोज पाणी मिळणार आहे. दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय रद्द व्हावा यावरून मागील पंधरा दिवस शहरामध्ये बराच राजकीय धुरळा उडत आहे. त्यामुळे धरणात इतके पाणी असूनही आपण पाण्याला वंचितच राहणार का? असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)- महापालिका दिवसाआड पाणी देण्यासाठी साधारण ९०० एमएलडी पाणी कॅनॉलमधून घेत होती. आता १२०० एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. त्यामुळेही काही अडचणी येतील. त्याचे नियोजन करावे लागेल. - दिवसाआड पाणी देताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी पाणीपुरवठा केला जात होता. त्याचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले होते. तेही आता बदलावे लागेल. - सर्वांना समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्नात आहे. सोमवारपर्यंत हे नियोजन पूर्ण होईल व त्यानंतर शहराला पूर्वीप्रमाणे रोज पाणी देण्यात काही अडचण येणार नाही, असे कुलकर्णी म्हणाले.