शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवस्तीतही मिळेना, मग उपनगरांतील नागरिकांनी पाण्यासाठी जलसमाधी घ्यायची का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत ...

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील रास्ता पेठ, कसबा पेठ, मंगळवार, सोमवार पेठेसह कोंढवा, हडपसर आणि समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी मिळत नाही, अशी तक्रार करीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची सूचनाही नगरसेवकांनी मुख्यसभेत केली. जर मध्यवस्तीत पाणी मिळत नसेल तर उपनगरांतील लोकांनी जलसमाधीच घ्यायला हवी, अशा शब्दांत नगरसेवकांनी आपली व्यथा व्यक्त केली.

धरणामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन आणि नियोजनशून्य कारभारामुळे पाणी मिळत नाही. याविषयावर शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, गफूर पठाण, बाबूराव चांदेरे, योगेश ससाणे, गणेश ढोरे, सचिन दोडके, मनसेचे वसंत मोरे, हरिदास चरवड, अजय खेडेकर, प्रशांत जगताप आदींनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पाणी असूनही एक ताससुद्धा पाणी दिले जात नसल्याचे जावळे, धनवडे यांनी निदर्शनास आणून दिले. पाण्याचे वेळापत्रक ठरविण्यात येत नाही. कोंढवा आणि हडपसरसारख्या भागातही पाणी देण्यात येत नाही. यापूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये पाण्याचे नियोजन नाही. शेतीचे आवर्तन बंद असल्याने कालव्याला पाणी नाही. कालव्याला पाणी सोडले तर विहिरींना पाणी येईल. वारजे-शिवणे परिसरातील नागरिक भारतातील आहेत. पाकिस्तानातून आलेले नाहीत. पाणीपट्टी घ्या, मात्र पाणीसमस्या सोडवा असे नगरसेवक म्हणाले.

उपनगरांतल्या नगरसेवकांनी जलसमाधी घ्यायची का? जिथे मध्यवस्तीत पाणी मिळत नाही, तिथे उपनगरांची अवस्था किती वाईट असेल याची कल्पना न केलेली बरी. कात्रज गाव २४ वर्षांपूर्वी पालिकेच्या हद्दीत आले. मात्र, १९९७ पासून आजवर पाणी याच विषयावर पालिकेशी भांडतोय. साठवण क्षमता वाढविण्यात येत आहे मग नियोजन का होत नाही? टाक्या बांधूनही पाणी मिळत नाहीये. भामा आसखेड, खडकवसल्याचे पाणी मुरतेय कुठे? असा सवाल मोरे केला.

प्रशांत जगताप म्हणाले की, १९९५ पासून पाण्याचा प्रश्न ऐकतोय. पुणे स्मार्ट होत असताना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. एसआरएच्या मोठ्या इमारतींमध्ये हंड्याने पाणी भरावे लागत आहे. लिफ्ट बंद आहे, मात्र जिन्याने पाणी भरावे लागत आहे. ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची आवश्यकता असल्याचे जगताप म्हणाले.

--------------

लवकर सकारात्मक बदल

यावर खुलासा करताना अनिरुद्ध पावसकर यांनी समान पाणीपुरवठा योजनेच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. यासोबतच येत्या काही दिवसांतच मध्यवस्तीसह उपनगरे आणि समाविष्ट गावांमधील पाणीसमस्या सोडविण्याबाबत सकारात्मक बदल दिसतील असे स्पष्ट केले.