शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संसार करूनही परमार्थ साध्य, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:37 IST

परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे.

पुणे - परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे. संसार सोडून गुरूची सेवा करण्यात परमार्थ नाही. गुरुंचे ज्ञान आचरणात आणणे म्हणजेच त्यांची खरी सेवा आहे. गृहस्थाश्रम हे सर्वश्रेष्ठ मानले आहे, म्हणून संसारात राहून देखील परमार्थ होऊ शकतो, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना संसार आणि परमाथार्चे विश्लेषण केले.बाबामहाराज सातारकर म्हणाले, वैराग्याचा अर्थ संसाराचा त्याग करणे नाही. आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करणे म्हणजे वैराग्य आहे. मन चंचल आहे, अनेकदा ते भरकटते, परंतु मनावर ताबा असणे महत्वाचे आहे. बाकीच्या कर्मात बंधने असतात. धर्म आचरण शेवटपर्यंत टिकेल का हे सांगता येत नाही. म्हणून वावगा संकल्प करू नको. ते म्हणाले, सांसारिक जीवनात असताना तुम्ही मयार्दांचे उल्लंघन केले तर संसार अवघड होतो. सांसारिक जीवनाचे काही नियम आहेत, त्याचा अवलंब केला तर संसार सोपा होतो. संतांच्या दृष्टीकोनात तुम्ही आम्ही सर्व सारखेच असतो. त्यामुळे संसार त्याग करून गुरूची सेवा करू नका, तर संसारात राहून त्यांच्या विचारांचा अवलंब करा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या