शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्पाने मिळाली संजीवनी

By admin | Updated: May 5, 2015 03:00 IST

साखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत

महेश जगताप, सोमेश्वरनगरसाखरेचे घसरलेल्या दरामुळे अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मात्र, ज्या कारखान्यांनी मद्यार्क, सहवीज आणि बायोगॅस सारखे प्रकल्प राबविले आहेत. तेच कारखाने सध्याच्या अडचणीच्या काळात तग धरून आहेत. विशेषत: इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेला मागणी असल्याने या कारखान्यांना फायदेशीर ठरत आहे. या हंगामात साखर उद्योग मंदिच्या सावटखालून चालला आहे. कारखाने सुरू झाल्यापासून वारंवार पडणाऱ्या साखरेच्या दरामुळे राज्य सहकारी बँकेने पाच वेळा साखरेच्या पोत्यावरील मूल्यांकन कमी केले. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले. राज्यातील साखर हंगाम संपला तरीही एकाही कारखान्याने शासनाने ठरवून दिलेली एफआरपी दिली नाही. यासाठी शेतकऱ्यांना एफआरपी देता यावी, यासाठी उशिरा का होईना, केंद्र सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून आले आहे. राज्य सरकारने साखर कारखान्यांसाठी २ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, याबाबत अजून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील ४० कारखाने वगळता इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजून एफआरपी अदा केली नाही. यासाठी कारखान्यांना अजून अद्याप ४०० ते ५०० रूपये कमी पडत आहेत. केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी २ हजार कोटीची जरी मदत केली असली तरी या रकमेतून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्या कारखान्यांकडे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प आहेत. त्याच कारखान्यांकडून एफआरपी प्रमाणे दर मिळू शकतो. राज्यातील ६७ सहकारी व खाजगी कारखान्यांनी साखर उत्पादनांबरोबरच डिस्टलरी प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पाची गुंतवणूक अत्यंत कमी असून नफा मात्र चांगला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढल्याने इथेनॉल बरोबरच अल्कोहोलचे दरही वाढले आहेत. राज्यात सहकारी व खासगी ६७ डिस्टलरी बरोबरच फक्त इथेनॉल निर्मिती करणारे ३४ सहकारी तर ५८ खासगी प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्पांची मिळून वर्षाकाठी ९० ते ९२ कोटी लिटर उत्पादन क्षमता आहे. मात्र चालू वर्षी राज्यातील उपपदार्थ प्रकल्पांमधून केवळ २० कोटी इथेनॉल निर्मिती झाली आहे. सन २०१४— १५ या हंगामात राज्यात ६० ते ६५ कोटी लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी इथेनॉल व अल्कोहोलचे दर ४ ते ५ रूपयांनी वाढले आहेत.