शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकाच्या बेकायदा विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्रीय स्तरावर समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:19 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये  ‘ग्लायफोसेट’ नावाच्या तणनाशकाची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये बेकायदा विक्री सुरु करण्यात आलेली आहे. याचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने समिती तयार केली आहे. 

ठळक मुद्देऔषध कंपन्यांनी जीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याचे आले समोर २५ नोव्हेंबर रोजी समितीची दुसरी बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात

पुणे : शेतामध्ये वाढणार्‍या तणांना नष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांकडून तणनाशकाची फवारणी केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये  ‘ग्लायफोसेट’ नावाच्या तणनाशकाची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये बेकायदा विक्री सुरु करण्यात आलेली आहे. हर्बीसाईट टॉलरन्स (एचटी जीन) हा प्रकार  देशात कसा आला, याचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने समिती तयार केली आहे. तणनाशक असलेल्या या औषधाच्या फवारणीमुळे कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम होत नसले तरी औषध कंपन्यांनी अद्याप या जीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. वास्तविक शासनाच्या जिनॉटीकल इंजीनिअरींग असेसमेंट कमिटीमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करुन घेणे आवश्यक होते. हे जीन अनधिकृतपणे बाजारात आले कसे याचा शोध घेण्यासाठी केंद्रिय पातळीवर गठीत करण्यात आलेल्या समितीची नुकतीच दिल्लीमध्ये बैठक झाली. या बैठकीला प्रमुख राज्यांमधील कृषी सचिव, कृषी आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि संचालक एम. एस. घोलप उपस्थित होते.किंमत कमी असल्याने शेतकरी हे तणनाशक विकत घेत आहेत. हे तण सध्यातरी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विकले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, बेकायदेशीरपणे हे जीन बाजारात आणण्यामागे नेमके कोण आहे याचाही शोध घेतला जाणार आहे. या जीनमधील विविध प्रकार तपासण्यासाठी पथकांची नियुक्तीही केली जाणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी समितीची दुसरी बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे. ही समिती या जीनचे पर्यावरणीय धोकेही तपासणार आहे. या जीनला परदेशामध्ये मान्यता असली तरी भारतामध्ये अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही.