लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सातबारा उताऱ्यासह फेरफार आणि इतर दाखले आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी हाताने (मॅन्युअली) दिलेल्या नोंदी काही ठिकाणी तशाच राहिल्या आहेत. परिणामी आॅनलाईन प्रसिद्ध झालेल्या फेरफारमध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे समोर आले आहे.राज्यात सुमारे २१ लाख फेरफार प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ लाख फेरफार संकेतस्थळावर आहेत, असा दावा भूमिअभिलेख विभागाने केला आहे. राज्य शासनातर्फे सातबारा उतारे आॅनलाईन करण्याची मोहीम मे महिन्यापासून हाती घेण्यात आली. त्यानुसार सहा महसुली विभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व जिल्ह्यात युद्धपातळीवर काम सुरू आहे. सातबारा उताऱ्यांबरोबरच फेरफार दाखले आॅनलाईन करण्यासाठी महसूल विभागाने तयारी सुरू केली आहे. फेरफार आॅनलाईन करताना त्रुटी राहिल्याचे समोर आले.
सातबारा उताऱ्यांच्या फेरफारमध्ये त्रुटी
By admin | Updated: July 2, 2017 03:52 IST