शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मरणाच्या सरणाला पर्यावरणाची चिंता...

By admin | Updated: February 11, 2016 03:04 IST

जन्माला आलेल्या प्रत्येकालाच शेवटचा श्वास संपला, की जावंच लागतं; पण या गावातील जाणाऱ्या व्यक्तीची चितादेखील पर्यावरणाची चिंता करताना दिसते. आश्चर्य

- अशोक खरात , खोडदजन्माला आलेल्या प्रत्येकालाच शेवटचा श्वास संपला, की जावंच लागतं; पण या गावातील जाणाऱ्या व्यक्तीची चितादेखील पर्यावरणाची चिंता करताना दिसते. आश्चर्य वाटलं ना.. पण, खोडद (ता. जुन्नर) या गावात जन्माला आलेल्या बालिकेचे ज्याप्रमाणे स्वागत होते, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही चितेला मुखाग्नी देताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी ग्रामस्थांकडून कटाक्षाने घेतली जाते. अंत्यसंस्कारांच्या वेळी अग्नी दिल्यानंतर उपस्थितांना, जीवसृष्टी, पशुपक्ष्यांना ‘त्या’ धुराचा प्रचंड त्रास व प्रदूषण होते, हे त्यांनी अनुभवलं आणि बदलायचं ठरवलं.....!अंत्यसंस्कारा वेळी जाळलेल्या टायरचा धूर शरीरात गेल्यानंतर माणसाला खूप अस्वस्थता निर्माण होते, तर पर्यावरणातील पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल..? या विचाराने खोडदच्या ग्रामस्थांनी ५ वर्षांपूर्वी हा पर्यावरणपोषक असा निर्णय घेतला. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी टायरचा वापर न करता केवळ लाकूड, तेल खोबरे, डालडा याचाच वापर करायचा. केवळ स्वयंस्फूर्तीनेच ग्रामस्थांनीच हा निर्णय घेतला आहे. ५ वर्षांपूर्वी टायर न जाळण्याचा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे.एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्ती जर निधन पावली, तर ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणीतून तेल व डालडा आणून हा विधी पूर्ण करतात. विशेष म्हणजे, कोणाचेही दडपण नाही की कोणाचीही भीती नाही; पण या गावातील व परिसरातील ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने हा नियम पाळतात. सामुदायिक विवाह सोहळा, विविध सामाजिक उपक्रम यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे व इतर गावांना एक आदर्श गाव म्हणून हेवा वाटणाऱ्या या गावाने हा उपक्रम सुरू करून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. (वार्ताहर)टायरच्या धुरातून कॅन्सरही होऊ शकतो...टायरच्या धुरातून कार्बन मोनोआॅक्साईड, सल्फर ओक्साईड, आॅक्साईड आॅफ नायट्रोजन आणि व्हॉल्याटाईल ओर्गानिक कंपाऊंड हे विषारी वायू बाहेर पडतात; तर आर्सेनिक, कॅडमियम, निकेल, झिंक, मर्क्युरी, क्रोमियम आणि व्हॅनिडीयम हे विषारी धातू बाहेर पडतात. या विषारी वायू व धातूंमुळे नाजूक त्वचेला आणि डोळ्यांना खाज येणे, श्वसनाचे विकार होणे, मेंदूचा कॅन्सर होणे, नैराश्य येणे आदी आजार उद्भवू शकतात.लाकडाच्या तुलनेत टायरमधून १३ हजार पटींनी अधिक विषारी वायू बाहेर पडून पर्यावरणात मिसळतात. अमेरिका व स्पेनच्या अहवालानुसार टायर जाळल्यामुळे होणाऱ्या वायूच्या उत्सर्गात मानवाला कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरणारे वायू व द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळतात. बेन्झीन, ब्यूटॅडीन आणि बेन्झ पायरीन ही द्रव्ये व वायू टायरच्या धुरामध्ये आढळून आली आहेत.