‘अगंबाई अरेच्चा २’चा प्रीमिअर : ‘लोकमत’तर्फे आयोजन, रसिकांचा उदंड प्रतिसाद पुणे : प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारे चित्रपटाचे कथानक, चित्रपटाच्या कथेबाबत ताणलेली रसिकांमधील उत्सुकता यामध्ये चित्रपट सुरू झाला आणि ‘अगंबाई अरेच्चा!’ अशी दाद प्रेक्षकांकडून मिळाली. रसिकांचे भरभरून मिळणारे प्रेम पाहून कलाकार भारावून गेले होते. चित्रपटगृहातील जागा संपल्यावर पायऱ्यांवरदेखील तितक्याच उत्साहाने बसून चित्रपट पाहणारे चाहते आणि उत्साहवर्धक वातावरणात ‘अगंबाई अरेच्चा २’ चा प्रीमियर रंगला.४‘लोकमत’ आणि चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेला ‘अगंबाई अरेच्चा २’चा प्रीमियर शो गुरुवारी रंगला. नवनवीन, दर्जेदार विषय घेऊन चित्रपट तयार करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना वाव देण्यासाठी आणि हे चित्रपट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘लोकमत सीनेमा’ उपक्रमाला चित्रपटातील कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता धर्मेंद्र गोहिल, मिलिंद फाटक, संगीतकार निषाद आदी कलाकारांनी ‘लोकमत’च्या सहयोगाबद्दल विशेष आभार मानले.‘लोकमत’ने ज्या पद्धतीने मराठी चित्रपटांना खंबीर पाठिंबा दिला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचण्याचा फायदा संपूर्ण चित्रपटसृष्टीला होणार आहे. अशाच प्रकारे दर्जेदार चित्रपटांची निवड करून त्यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. - केदार शिंदे, दिग्दर्शक ‘लोकमत सी नेमा’ उपक्रमाद्वारे मराठी सिनेमा राज्याच्या सर्व भागांपर्यंत नेण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न आहे. मराठी चित्रपटाला लोकाश्रय मिळून तो अधिक संपन्न व्हावा, यासाठी या उपक्रमांअंतर्गत कलाकारांना रसिकांशी जोडणारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. - मिलन दर्डा, महाव्यवस्थापक, लोकमत ‘लोकमत’ हे ग्राहककेंद्री वृत्तपत्र असल्याने वाचकांना काय आवडत आहे हे ओळखून विविध उपक्रम ‘लोकमत’ राबवते. त्याप्रमाणेच ‘लोकमत सीनेमा’ हादेखील अतिशय चांगला उपक्रम आहे. यामुळे गावोगावी मराठी चित्रपट पोहोचण्यास मदत होत आहे.नरेंद्र फिरोदिया, निर्माते, इरॉस इंटरनॅशनल‘लोकमत सीनेमा’ हा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याशिवाय सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे वृत्तपत्र असल्याने समाजातील सर्व लोकांपर्यंत मराठी चित्रपट पोहेचत आहे. आणि नवीन चेहऱ्यांना लवकरात लवकर प्रसिद्धी मिळत आहे.- निषाद निलांबरे, संगीतकार लोकमत सीनेमा हा उपक्रम खूपच सुंदर आहे. मराठी चित्रपटसृष्टी वाढावी ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यामध्ये ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे. असे सहकार्य मिळाल्यास मराठी चित्रपटसृष्टी निश्चितच प्रगती करेल. - अमोल येमूल, संचालक, पेशवाई क्रिएशन.एक माध्यम ‘लोकमत सीनेमा’ हा उपक्रम राबवत आहे ही खरच आनंदाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या मदतीने नवीन विषय असूनही सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकत आहे.- मिलिंद फाटक,अभिनेता तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा एक चांगला उपक्रम ‘लोकमत’ राबवत आहे. अशा उपक्रमांमुळे अमराठी लोकही मराठी चित्रपट पाहण्याला प्राधान्य देत आहेत.- डॉ. प्रसन्ना ढोरे, महाव्यवस्थापक, चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूट अतिशय प्रशंसनीय उपक्रम आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीला चालना मिळण्याची गरज असून, त्यादृष्टीने हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. प्रेक्षकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल.- प्रमोद वाणी, संचालक, पाटे डेव्हलपर्सअशा नवीन उपक्रमांची लोकांना सवय होण्यासाठी वेळ लागेल. परंतु ही एक चांगली सुरुवात आहे. ‘लोकमत’ हे सर्वाधिक खपाचे दैनिक आहे. त्यामुळे मराठी चित्रपटातील नवीन विषय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत आहे. चांगल्या पद्धतीने मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यास ‘लोकमत’चा मोलाचा वाटा आहे.- दिलीप प्रभावळकर, लेखक, ज्येष्ठ अभिनेते.हा उपक्रम चांगला तर आहेच, परंतु त्याशिवाय नवीन लोकांनाही यामधून प्रोत्साहन मिळत आहे. सकारात्मक दृष्टीने वेगवेगळे विषय हाताळण्याची आणि लोकांसमोर मांडण्याची संधी नवोदित कलाकारांना मिळणार आहे.- धर्मेंद्र गोहिल, अभिनेता हा खरोखरीच चांगला उपक्रम आहे. अशा दर्जेदार चित्रपटांना ‘लोकमत’च्या माध्यमातून साथ मिळाली तर कायद्याची गरजच पडणार नाही.- प्रा. राजन वाळवेलोकमत आपल्या दारी ज्याप्रमाणे घराघरांपर्यंत पोहोचला आहे त्याप्रमाणेच ‘लोकमत सीनेमा’ हादेखील सर्व लोकांपर्यंत पोहोचणारा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याशिवाय या माध्यमातून मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळवून देण्याचा उद्देश खूपच चांगला आहे.- अरविंद पाटील, सहायक पोलीस आयुक्त या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटांची जास्तीतजास्त प्रसिद्धी होण्यास मदतच होईल. आणि मराठी चित्रपट कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. - कल्पेश जैन,आगम रिअॅलिटीया प्रकारच्या उपक्रमांमुळे मराठी चित्रपटांना निश्चितच खूप फायदा होईल. आणि अशा प्रकारे मराठी चित्रपटांची प्रसिद्धी केली गेली तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला अजून चांगले दिवस येतील.- अरविंद चाफळकर, कोथरूड सिटीप्राईडलोकमत सीनेमा हा अतिशय चांगला उपक्रम राबवून ‘लोकमत’ मराठी चित्रपटांना उत्तम प्रकारे पाठिंबा दर्शवत आहे. यामुळे हिंदी चित्रपटांना प्राधान्य देणारे प्रेक्षकही मराठी चित्रपटांकडे वळू लागले आहेत, ही आनंदाची बाब आहे. - भावेश सोळंकी, केंशा मोबाईल स्टोअर मराठी सिनेमासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून लोक चित्रपटगृहाकडे वळतील. यामुळे मराठी सिनेमाचा प्रसार वाढण्यास मदत होणार आहे. - अभय केळे, संचालक, पृथ्वी एडीफाईस.‘लोकमत सीनेमा’ हा उपक्रम खरोखरच स्वागतार्ह आहे. कारण चित्रपटांकडे आता एक चळवळ म्हणून बघण्याची गरज आहे. यापुढे केवळ मराठी चित्रपटांसाठी हा उपक्रम मर्यादित न ठेवता ग्लोबल सिनेमांनाही पाठिंबा द्यावा आणि विविध भाषांमधील चित्रपटांमधील उत्तम विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत. - सोनाली कुलकर्णी,अभिनेत्री
उत्साह, उत्सुकता अन् अगंबाई अरेच्चा!
By admin | Updated: May 23, 2015 00:43 IST