शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग, गणेशोत्सवाच्या खरेदीला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:12 IST

काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे.

अवसरी : काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे.परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गणेशमूर्ती बुकिंग करण्यासाठी वर्दळ वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेशमूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. गुरुवार, दि. १३ रोजी गणेशाची घरोघरी आणि विविध मंडळांच्या वतीने स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे येथील कारखान्यात मूर्ती पसंत करून बुकिंग करण्यात कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. येथील कारखान्यात ९ इंचापासून ते १० फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनविण्यात आल्या आहे. या वर्षी जीएसटीमुळे रंग, कच्चा माल, पिओपी, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे या वर्षी मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. अशी माहिती मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी दिली. मूर्ती बनविण्याचे काम जवळपास वर्षभर चालू असते. १० ते १५ कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. श्रींच्या विविध रूपातील आकर्षक मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कारागीर मग्न आहेत. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, आसनावर बसलेल्या मूर्तींना जास्त मागणी आहे. येथे युको फ्रेंडली मूर्ती पण तयार केल्या आहेत. पुणे, नाशिक, शिरूर, चाकण, खेड, लोणी, धामणी, निमगाव सावा आदी गावांतील गणेश मंडळांनी मूर्तीची मागणी केली आहे. ५०० रुपयांपासून पुढे मूर्तीच्या किमती आहेत. लहान-मोठ्या अशा सुमारे ४ हजार मूर्ती बनविल्या आहेत. यासाठी मयूर कराळे, शशिकांत भोर, योगेश गायकवाड, अनिल जाधव, कु. मयूरी राजगुरू, स्वप्नील ढाणे, प्रशांत साळवे, दत्ता साळवे या कारागिरांनी काम केले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव