शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातून येणा-यांच्या माहितीची खातरजमा

By admin | Updated: August 29, 2014 04:27 IST

इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे

पुणे : इबोलाची साथ पसरलेल्या देशांमधून भारतात परत येणाऱ्या प्रवाशांकडून विमानतळावर आल्यानंतर खोटी माहिती दिली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे स्थानिक आरोग्य विभागांना जिकिरीचे जात असल्याची बाब लोकमतने उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्याच्या आरोग्य विभाग पुणे आणि मुंबई विमानतळ प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असून, या नागरिकांच्या माहितीची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ‘इबोलाच्या भीतीने आरोग्य विभागाची घालमेल’ या वृत्ताद्वारे ही बाब लोकमतने समोर आणली होती.गेल्या दोन आठवड्यांत ४६ नागरिक या आजाराची साथ असलेल्या देशांमधून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील आहेत. त्यातील जवळपास १५ नागरिकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक दिले असून, काही जणांचे मोबाईल पुण्यात आल्यापासून नॉट रिचेबल आहेत. याबाबत डॉ. जगताप म्हणाल्या की, विमानतळावर आल्यावरच या नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात येते. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक चुकीचा देणे ही बाब गंभीर असल्याने तसेच या साथीच्या आजाराचा धोका असल्याने हे प्रकार घडू नयेत, यासाठी लोहगाव व मुंबई विमानतळ प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक आणि दिलेला पत्ता याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच प्रवाशांचे तिकीट त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्टवरील पत्ता या विविध माध्यमांद्वारे त्या नागरिकांना शोधणे शक्य असल्याने ही माहिती उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली जाईल, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)