शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘मस्ती की पाठशाला’ उपक्रमातून ऑनलाइन आनंददायी शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

कदमवाकवस्ती : शाळा थांबल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी अ‍ॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (एटीएम) या राज्यस्तरीय शिक्षकांच्या समूहाने ...

कदमवाकवस्ती : शाळा थांबल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी अ‍ॅक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र (एटीएम) या राज्यस्तरीय शिक्षकांच्या समूहाने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी एटीएम ‘मस्ती की पाठशाला’ हा नावीन्यपूर्ण ऑनलाइन उपक्रम सुरू केला असून, राज्यभरातील हजारो विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊन आनंददायी शिक्षण घेत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहणे गरजेचे आहे, हे ओळखून राज्यस्तरीय काही शिक्षकांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केला आहे. त्यास विद्यार्थ्यांचादेखील प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत.

प्रत्यक्ष ऑनलाइन चॅनलद्वारे कार्यक्रम प्रक्षेपित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. मुलांच्या वयोगट व आवडीनुसार वेगवेगळ्या विषयांची निवड केली आहे. त्यात बाहुलीनाट्य, गोष्टी, कागदकाम, चित्रकला, मुलाखत, आहार, प्राणायाम, विज्ञानातील गमती-जमती, नृत्य, कविता, अभिनय संवाद आदी विषयांचा समावेश आहे.

दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत चालणाऱ्या या उपक्रमात २७ मे ते ५ जून या पहिल्या टप्प्यात दहा हजार विद्यार्थी सहभाग घेतला. दुसऱ्या टप्प्यात १५ जून ते २९ जून शाळा पूर्वतयारीबाबत शिबिर घेण्यात येणार आहे. तर १ जुलै ते ३० जुलैपर्यंत उजळणी वर्ग घेण्यात येऊन १ ऑगस्टपासून पुन्हा ऑनलाइन शिक्षणास प्रारंभ करण्यात येणार आहे.

लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबापडळ येेथील विद्यार्थीदेखील मस्ती की पाठशाला या उपक्रम रमले आहेत.

लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर व शाळा व्यवस्थापन समिती लाडबापडळ यांनी विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन करून शिक्षक चित्रा गवारे व तुषार चौधरी यांच्या मदतीने मार्गदर्शनाने या वर्गास विद्यार्थी सहभागी करून शाळेतील गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले.